Maratha Reservation: सर्वपक्षीय अध्यक्षांच्या घरासमोर मराठा समाज खंजीर-गाजर आंदोलन करणार...

Maratha Reservation Latest News: 2018 ला भाजप-सेना सरकारमध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं. पण ते 50% च्या वर दिल्याने टिकले नाही. शेवटी ते सुद्धा गाजरच सिद्ध झाले.
Maratha Reservation: सर्वपक्षीय अध्यक्षांच्या घरासमोर मराठा समाज खंजीर-गाजर आंदोलन करणार...
Maratha community will stage agitation in front of all party president's house ...Saam Tv

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन मराठा समाजाच्या वतीने राज्यातील सर्व पक्षांच्य अध्यक्षांच्या घराबाहेर आंदोलन (Agitation) करणार आहे. या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकात पाटील आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश आहे. याबाबत सकल मराठा समाजाचे आंदोलक तरुण योगेश केदार यांनी माहिती दिली आहे. (Maratha community will stage agitation in front of all party president's house ...)

हे देखील पहा -

मराठा समाजाचे तरुण आंदोलक योगेश केदार (Yogesh Kedar) म्हणाले की, "येत्या 23 मार्चला शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरासमोर मराठा समाजाच्या वतीने खंजीर दिवस साजरा करण्यात येणार आहे. याच दिवशी 23 मार्च 1994 रोजी शरद पवार मुख्यमंत्री असताना एक जीआर (Government Resolution) काढला गेला आणि राज्यात 14% असलेल्या ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवून 30% केली गेली. ती मर्यादा नेमकी कशाच्या आधारावर वाढवली गेली?" असा प्रश्न विचारत त्याबाबत श्वेत पत्रिका काढावी अशी मागणी मराठा समाजातून होत आहे.

हे देखील पहा -

यामुळेच नंतरच्या काळात 50% च्या आत आरक्षण शिल्लक राहिले नाही, कुणाचे काढून नको अशी चुकीची मांडणी होत राहिली. त्यामुळे समाजाने हक्काचे 50% च्या आतले आरक्षण शोधून तेच परत मिळाले पाहिजे अशी मागणी लावून धरली आहे. 21 मार्चला चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर गाजर आंदोलन केले जाईल. 2018 ला भाजप-सेना सरकारमध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं. पण ते 50% च्या वर दिल्याने टिकले नाही. शेवटी ते सुद्धा गाजरच सिद्ध झाले. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी, विस्थापित मराठा समाजातील तरुण पिढी पुढे येत आहे. सर्वपक्षीय नेत्यांना जाब विचारण्याचे काम केले जाणार असं योगेश केदार म्हणाले.

Maratha community will stage agitation in front of all party president's house ...
Nagpur Election 2022: नागपूर मनपा निवडणूकीसाठी शिवसेनेची स्वबळाची तयारी

यादिवशी या नेत्याच्या घरासमोर असेल आंदोलन:

1) 21/03/2022 - 'गाजर आंदोलन': चंद्रकांत पाटील, प्रदेश अध्यक्ष - भाजप

२) 23/03/2022 - 'खंजीर आंदोलन': शरद पवार, संस्थापक अध्यक्ष -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

3) 25/03/2022 - 'गाजर आंदोलन': उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख - शिवसेना

4) 27/03/2022 - 'खंजीर आंदोलन': नाना पटोले, प्रदेश अध्यक्ष - काँग्रेस

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com