Mumbai Fire : मुंबईत पुन्हा अग्नितांडव, Prime Mall ला भीषण आग...(पहा व्हिडिओ)
Mumbai Fire : मुंबईत पुन्हा अग्नितांडव, Prime Mall ला भीषण आग...(पहा व्हिडिओ)Saam Tv

Mumbai Fire : मुंबईत पुन्हा अग्नितांडव, Prime Mall ला भीषण आग...(पहा व्हिडिओ)

मुंबईमधील विलेपार्ले परिसरामधील इर्ला मार्केट या ठिकाणी प्राईम मॉलला ही आग लागली

मुंबई : मुंबईमध्ये परत एकदा भीषण आग लागली आहे. मुंबईमधील विलेपार्ले परिसरामधील इर्ला मार्केट या ठिकाणी प्राईम मॉलला ही आग लागली असल्याती माहिती समोर येत आहे. ही आग इतकी भीषण आहे की लांबच- लांब दुराचे लोट बघायला मिळत आहेत. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आगीची तीव्रता बघता इर्ला मार्केट परिसरात रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या परिसरात अतिशय गजबजलेला असून, परिसरात अनेक दुकाने आहेत. विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या विक्रीकरिता हा बाजार ओळखला जातो. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप आजून मिळू शकले नाही. आग अतिशय वेगाने पसरत असल्याचे बघायला मिळत आहे.

पहा व्हिडिओ -

अग्निशमन दलाने ही लेवल तिनची आग असल्याचे जाहीर केले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले, असून आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई मधील Mumbai पवई परिसरात असलेल्या साकी विहार रोडवर लार्सन अँड टुबरो कंपनीच्या समोर साई ऑटो ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला देखील गुरुवारी भीषण आग लागली होती.

हे देखील पहा-

यामुळे बाजूच्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉटर टँकर दाखल करण्यात आले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत होते.

Mumbai Fire : मुंबईत पुन्हा अग्नितांडव, Prime Mall ला भीषण आग...(पहा व्हिडिओ)
Mumbai : राजकीय नेत्याने पैसे बुडवल्याने व्यावसायिकाची आत्महत्या

जवळपास २ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे, ही आग नेमकी कशामुळे लागली आहे. याविषयी अद्याप माहिती मिळू शकली नाही. ही आग इतकी भीषण आहे की, आसपासच्या परिसरामध्ये सर्वत्र धुराचे लोट बघायला मिळत होते. तसेच धुराचे लोट हे २० ते ३० फुट उंचावर जाताना देखील दिसून येत होते.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com