कांजूरमार्ग येथील सॅमसंग सर्विस सेंटरला भीषण आग; पाहा Video

मात्र या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानांनी प्रयत्न केले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कांजूरमार्ग येथील सॅमसंग सर्विस सेंटरला भीषण आग; पाहा Video
कांजूरमार्ग येथील सॅमसंग सर्विस सेंटरला भीषण आग; पाहा VideoSaam TV

कांजूरमार्ग येथील सॅमसंग सर्विस सेंटर येथे काल रात्रीच्या सुमारास भीषण आग (Kanjurmarg Fire) लागली, या ठिकाणी सॅमसंग सर्व्हिस सेंटरचा गोडाऊन असून या ठिकाणी घरगुती किराणा मालाच देखील गोडाऊन आहे. तसेच केटरिंग किचन देखील याठिकाणी आहे आणि शॉर्टसर्किटमुळे केटरिंग किचनमध्ये आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत आणि आग लागल्यामुळे या ठिकाणी या वस्तूंचा देखील स्पोर्ट झाल्यामुळे ही आग भीषण झाली असून या ठिकाणी जे कर्मचारी लोक होती त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे. तसंच आजूबाजूला दाटीवाटीच्या परिसर असल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या जाण्यास अडथळा येत होता. मात्र या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानांनी प्रयत्न केले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान राज्यात सध्या आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मागील आठवड्यात अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला आग लागली आणि यात ११ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच कांजूरमार्गमध्ये आग लागली आहे. ही आग अतीशय भीषण होती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आगीचे आणि धुराचे लोट किती भयंकर होते. आता परत प्रश्न उपस्थीत झाला आहे की कंपनीचं फायर ऑडीट झालं होतं का?

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com