पालघरच्या तारापूर एमआयडीसी प्लांटला भीषण आग; सलग 8 मोठे स्फोट

आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट
Palghar News
Palghar NewsSaam Tv

पालघर - जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमध्ये (MIDC) गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याच आता पालघर (Palghar) येथील तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये काल रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कंपनीत आग लागल्यापासून सलग 8 मोठे ब्लास्ट झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग (Fire) आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत करत होते अखेर अग्निशमन दला प्रयत्नांना यश आले असून आगीवर नियंत्रण मिळ्वण्यात आले आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

हे देखील पाहा -

आग लवकरच आटोक्यात आणली नाही तर मोठे नुकसान होण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली असल्याचे समजते. बोईसर येथील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रीमियर इंटरमीडियरी केमिकल कंपनीला भीषण आग लागली. या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Palghar News
लातुरात स्कूल बस पलटी; सुदैवाने सात विद्यार्थी बचावले

स्थानिक पालिका प्रशासन, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीत ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे. मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या आगीमुळे कोणतीही जीवित व वित्तहानीबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, याआधी दोन महिन्यांपूर्वीही येथील केमिकल प्लांटला भीषण आग लागली होती. दोन महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने नागिरकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com