
Maval Crime News : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव पालिकेच्या कार्यालयासमोर (talegaon dabhade muncipal council office) आज (शुक्रवार) प्राणघातक हल्ला झाला. ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले हाेते. त्यांना सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले. (Breaking Marathi News)
या घटनेबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहिती अशी : किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेण्यासाठी पालिका कार्यालयात आले. ते मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी आवारे यांच्यावर खुनी हल्ला केला.
त्यापैकी दोघांनी गोळीबार केला. तर दोघांनी आवारे यांच्यावर कोयत्याने वार केले. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काही वेळ तेथेच थांबून होते. दरम्यान जखमी अवस्थेतील आवरे यांना काही नागरिकांनी सोमाटणे फाटा (somatane phata) येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा उपाचारापुर्वीच मृत्यू झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.