Maval : मळवंडी ठुले येथील विद्यार्थ्यांना गर्जे प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप

हेच विद्यार्थी पुढे जाऊन मोठे शास्त्रज्ञ, अधिकारी, राजकारणी, खेळाडू बनतील, विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करून देशाची मान उंचावतील त्यामुळे या काळात त्यांचा आधार बनून त्यांना मदत करणे गरजेचे असल्याचे प्रा. गर्दे सर सांगतात.
Maval : मळवंडी ठुले येथील विद्यार्थ्यांना गर्जे प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप
Maval : मळवंडी ठुले येथील विद्यार्थ्यांना गर्जे प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटपदिलीप कांबळे

मावळ : राज्य सरकारने शाळा सुरू केल्या, मात्र विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले नाही. मावळ मध्ये अतिशय दुर्गम भागात अजूनही विद्यार्थी चिखल तुडवत उन्हा तान्हात शाळेत येतात. मात्र, हातावरचे पोट असलेल्या आई वडिलांना हा शिक्षणाचं भार उचलता येत नाही. हीच बाब गर्जे सर यांना लक्षात आली आणि  सामाजिक बांधिलकी जपत दुर्गम भागातील आदिवासी कातकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. मावळ मधील पवन मावळातील मळवंडी ठुले येथे जिल्हा परिषद प्राथमिक आहे. चारही बाजूंनी डोंगर आणि त्याच्या मध्ये ही शाळा आहे.

हे देखील पहा :

या भागात कातकरी, आदिवासी हा समाज मोठ्या प्रमाणात आहे. डोंगराळ भाग असल्याने या समाजाचा मुख्य व्यवसाय हा डोंगरात येणारी रान भाजी विकून उदरनिर्वाह करणे हा असून थोडीफार पोटापुरती शेती करणे अही अवस्था येथील आदिवासींची आहे. शिक्षणाचं महत्व आता कुठे त्यांना लक्षात आले त्यांनी मुले शाळेत पाठवायला सुरुवात केली. या भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांची कोरोना संकटाच्या आणि टाळेबंदीच्या पश्चात आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली. यासाठीच सर्व प्रथम प्रा. संपत गर्दे सरांनी हा भाग पिंजून काढला व येथील विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्या.

Maval : मळवंडी ठुले येथील विद्यार्थ्यांना गर्जे प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप
देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलंय - भाई जगताप

या विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे, मुले ही देवाघरची फुले असतात त्यांना शिक्षण मिळालेच पाहिजे, हेच विद्यार्थी पुढे जाऊन मोठे शास्त्रज्ञ, अधिकारी, राजकारणी, खेळाडू बनतील, विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करून देशाची मान उंचावतील त्यामुळे या काळात त्यांचा आधार बनून त्यांना मदत करणे गरजेचे असल्याचे प्रा. गर्दे सर सांगतात. मावळातील मळवंडी ठुले या गावातील जिल्हा परिषद शाळेत स्वर्गवासी माणिकराव गर्जे प्रतिष्ठानच्या वतीने प्राध्यापक संपत गर्जे यांच्या माध्यमातून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शालेय साहित्य बघून मुलांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद दिसत होता. यावेळी चांगला अभ्यास करून मोठे अधिकारी होऊ असा शब्दही विद्यार्थ्यांनी सरांना दिला.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.