Pune Zilla Parishad News : भाजे गाव ठरलं Smart Village; सरपंच चेतन मानकर यांच्या प्रयत्नांना यश

या निवडीमुळे गावात आनंदाेत्सव साजरा केला जात आहे.
bhaje village bagged first prize in smart village contest
bhaje village bagged first prize in smart village contestsaam tv

Maval News : पुणे जिल्हास्तरावर राबविण्यात आलेल्या स्मार्ट व्हिलेज (smart village) अर्थात सुंदर गाव स्पर्धेत मावळ (maval) तालुक्यातील भाजे लेणीच्या (bhaje caves) सानिध्यात असलेले भाजे गावाने उज्जवल यश मिळविले आहे. या गावचे सरपंच चेतन मानकर (sarpanch chetan mankar) हे आदर्श सरपंच ठरले आहेत. (कै.) आर. आर. पाटील स्मार्ट व्हिलेज अंतर्गत जिल्हास्तरीय सुंदर गाव स्पर्धेत तालुका निहाय विविध गावांची पडताळणी करण्यात आली होती. त्यात भाजे गावास यश आले, (Maharashtra News)

bhaje village bagged first prize in smart village contest
Saam Impact : 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर पाेलिसांच्या धडक माेहिमेस प्रारंभ, सांगलीत दाेन युवकांना अटक

अतिशय सुनियोजित पद्धतीने गावाचा विकास करत गावात रोजगाराच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, अपंग, वृद्ध या नागरिकांना वैयक्तिक लाभाच्या योजना मंजूर करून देणे. भौतिक सुविधा युक्त गाव तयार करत एक आदर्श निर्माण केले आहे. अशा विविध पातळीवर ही पडताळणी करण्यात येऊन गावांची निवड करण्यात येत असते.

bhaje village bagged first prize in smart village contest
Palghar Well Story | आईची पाण्यासाठी नाही पहावली वणवण, लेकराने अंगणातच खोदली विहीर

या सर्व निकषांमध्ये मावळ तालुक्यामधील भाजे गाव याची निवड झाली. या गावाची सुंदर गाव स्मार्ट व्हिलेज म्हणून निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून (pune zilla parishad) या निवडी जाहीर करण्यात आल्या. तालुकास्तरावरील सुंदर गावाला दहा लाख रुपये व जिल्हास्तरावरील सुंदर गावाला चाळीस लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com