
Maval News: पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा केला जाणार आहे. तब्बल १२ वर्षांनी राज्य सरकारने या आदेशावरील बंदी उठवली आहे. त्यामुळे जलवाहिनीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु या जलवाहिनीच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मावळचे राजकारण तापले असून सत्तेत असलो तरी पवना जलवाहिनी प्रकल्पाला विरोध करणार असल्याची भूमिका आमदार सुनील शेळके यांनी घेतली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पवना बंदिस्त जलवाहिनीवरील स्थगिती उठविल्यानंतर मावळात राजकारण पेटू लागले आहे. पवना जलवाहनी बनविण्याचा प्रस्ताव तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काढला होता. त्यावेळी विरोध दर्शवत प्रखर आंदोलन झाले होते.
मात्र आता बंदी उठविल्यानंतर मावळमधील (Maval) सर्वपक्षीय एकत्र येऊन विरोध करत आहेत. मावळ मधील स्थानिक आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी सरकारने विश्वासात न घेताच हा निर्णय केला असल्याचा आरोप केला आहे.
धरणग्रस्तांचे पुनर्वसन आदींची पूर्तता न करताच हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. शेतकऱ्यांना बरोबर घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकत नाही. शेतकरी जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या बाजूने मी ठामपणे उभा राहणार असल्याचा पवित्रा राष्ट्रवादीचे (NCP) स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी घेतला आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.