धरण उशाला अन् कोरड घशाला; मावळमध्ये हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण

आंदर मावळमध्ये आंध्रा धरण, वडिवळे धरण असून या आदिवासी धनगर बांधवांना पाण्याची सोय उपलब्ध झालेली नाही
Maval Taluka
Maval TalukaSaam Tv

मावळ: मावळ तालुक्यातील (Maval Taluka) नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील नाणे मावळ, आंदर मावळ, या सीमावर्ती (Maval Village) भागात राहत असलेल्या पाले पठार, उकसान पठार , करजगाव पठार, कुसुर पठार , कुसवली पठार, कांब् पठार, सटवाईवाडी या भागातील आदिवासी आणि धनगर बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या भागात तरुणांची संख्या जास्त असल्यामुळे या समस्यांना त्यांना जास्त तोंड द्यावं लागत आहे.

Maval Taluka
उन्हाचा कहर; उष्माघातामुळे १३ दिवसांत पाच जणांचा मृत्यू

आंदर मावळमध्ये आंध्रा धरण, वडिवळे धरण असून या आदिवासी धनगर बांधवांना पाण्याची सोय उपलब्ध झालेली नाही. धरण उशाला आणि कोरड घशाला. अशी परिस्थिती येथील नागरिकांची झाली आहे. येथे असलेल्या विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्याने त्यामध्ये फक्त गाळ शिल्लक आहे. त्यातच गेल्या सात ते आठ वर्षापासून विहिरीतील गाळ काढल्या गेला नसल्याने येथील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे गावात आजाराचे प्रमाणही वाढले आहे.

विहिरीतून पाणी काढण्यासाठी कसलीही यंत्रणा नसल्याने नागरिकांना पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना खोल विहिरीत उतरावे लागत आहे. घरात चूल पेटावी आणि स्वयंपाक व्हावा यासाठी गावातील महिलांना अतिशय कसरत करून पाणी आणावे लागत आहे. त्यातच पाणी काढण्याची सोय नसल्यामुळे हा जीवघेणा प्रवास कधी संपेल, असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहे. दरम्यान या गावात रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही, त्यामुळे इथे कोणत्याही मुलाला मुलगी मिळत नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.

दुसरीकडे रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहे. एखादा नागरिक आजारी पडला तर झोळी करून टाकावे, तळेगाव वडगावला औषध उपचारासाठी न्यावे लागते. प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी आणि संस्थांनी या आदिवासी धनगर बांधवांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिक करत आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com