Singham Returns : तरुणीला वाचवण्यासाठी मुंबईच्या सिंघमनं स्वतःवर झेलले चाकूचे वार

Brave Officer In Mumbai Police : तरुणीला वाचवण्यासाठी स्वतःच्या अंगावर वार झेलणाऱ्या या रीअल लाईफ सिंघमचं सगळीकडे कौतुक होतंय.
mayur patil from mumbai police has saved a woman from knife attack in mumbai
mayur patil from mumbai police has saved a woman from knife attack in mumbaiFacebook/ @ महाराष्ट्र पोलीस - वर्दीतला माणूस

रश्मी पुराणिक

मुंबई: मुंबई पोलीस दल हे जगातील सर्वात उत्कृष्ट पोलिसांपैकी एक मानलं जातं. मुंबई पोलिस दलातील अनेक जवान हे आपल्या कर्तव्यपरायणतेत कसलीही कसर सोडत नाही. याचं ताजं उदाहरण पाहायला मिळालंय ते म्हणजे मुंबईतल्या वडाळा येथील बरकत अली नाक्यावर (Barkat Ali Naka in Wadala). याठिकाणी एका माथेफिरु प्रियकरानं आपल्याच प्रेयसीवर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. मात्र ऐन प्रसंगी मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी मयूर पाटील (Mayur Patil, Mumbai Police) यांनी धारदार चाकूचे वार स्वतःवर झेलले आणि त्या तरुणीचा जीव वाचवला. याशिवाय माथेफिरु प्रियकरालाही त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं ताब्यात घेतलं. या घटनेनंतर गृहराज्य मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी या पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक केलं आहे. (mayur patil from mumbai police has saved a woman from knife attack in mumbai)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार ३१ वर्षाय अनिल बाबर आणि अंकिता यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनीही लग्न करायचे होते. अनिलच्या कुटुंबियांनी अंकिताच्या घरच्यांकडे लग्नाची मागणी केली होती. मात्र या लग्नासाठी अंकिताच्या घरातले तयार नव्हते. त्याच्या या लग्नाला विरोध होता. त्यामुळे अनिल अंकिताच्या घरच्यांवर आणि अंकितावर नाराज होता. आज (गुरुवारी) अंकिता नेहमीप्रमाणे कामाला जाण्यासाठी निघाली. ती शिवडीच्या बरकत अली नाका येथे पायी जात होती. एवढ्यात अनिल तिथे आला आणि तरुणी रस्ता क्रॉस करत असताना अनिलने अंकिताच्या पाठीवर धारदार चाकूने वार केला. त्यावेळी तेथे तैनात असलेले वडाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी मयूर पाटील यांनी समयसूचकता दाखवत तात्काळ धाव घेतली आणि अनिलला रोखण्याचा प्रयत्न केला.

mayur patil from mumbai police has saved a woman from knife attack in mumbai
धक्कादायक! पतीच्या टोमण्याला पत्नी कंटाळली; केले 'हे' भयंकर कृत्य

या झटापटीत रागात असलेल्या अनिलने मयूर पाटील यांच्यावर चाकू फिरकावला असता तो चाकू पाटील यांच्या हाताला लागला आणि त्यांच्या हाताला मोठी जखम झाली. मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी त्या माथेफिरु तरुणाला पकडून ठेवले. तेवढ्या वेळेत इतर पोलीस तिथे आले आणि त्यांनी तरुणाला ताब्यात घेतले. त्यानंतर तरुणीलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तरुणी आता सुरक्षित आहे. ही थराराक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी याची दखल घेतली आणि ट्विट करत मयूर पाटील यांचं कौतुक केलं आहे. आपली ड्यूटी निभावत असताना तरुणीला वाचवण्यासाठी स्वतःच्या अंगावर वार झेलणाऱ्या या रीअल लाईफ सिंघमचं (Singham) सगळीकडे कौतुक होतंय.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com