
Mumbai Mega Block Latest News: मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या कामासाठी मध्य रेल्वेने आजपासून म्हणजेच सोमवारपासून रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून यादरम्यान हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील रात्री उशिरा धावणाऱ्या आणि पहाटे धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
यामुळे रात्री उशीरापर्यंत कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना मोठा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर म्हणजेच जेएनपीटी ते ग्रेटर नोएडातील दादरीपर्यंत फ्रेट कॉरिडॉरसाठी काम सुरू आहे. (Latest Marathi News)
त्यामुळे दररोज रात्री सुमारे ३ तासांचा ब्लॉक घेण्यात येत होता. आता पनवेल स्टेशन यार्डमध्ये दोन मार्गिका उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे ब्लॉकचा कालावधी वाढवून रात्री ५ तास करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटीहून पनवेलकडे जाणारी शेवटची लोकल रात्री १०.५८ वाजता असेल.
त्यानंतर पनवेलच्या गाड्यांना बेलापूरलाच (Belapur) थांबा देण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पनवेल स्थानकावर डीएफसीसाठी दोन ट्रॅक तयार करण्यात येत असून, त्यासाठी ४५ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यातील ब्लॉक घेण्यात आले आहेत, आता दुसऱ्या टप्प्यात २ ऑक्टोबरपर्यंत ब्लॉक (Block) घेण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत काही लोकल सेवा रद्द राहतील, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून प्रवाशांनी लोकल ट्रेनचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
दरम्यान, या ब्लॉक कालावधीत हार्बर लाईनवरील सीएसएमटीहून पनवेलकडे जाणारी शेवटची लोकल रात्री १०.५८ वाजता असेल. तर ठाण्याहून पनवेलला जाणाऱ्या शेवटच्या लोकलचा टायमिंग रात्री ११.३२ असेल. याशिवाय पनवेलकडून ठाण्याला जाणारी शेवटची लोकल रात्री १०.१५ वाजता असेल. या ब्लॉकचा कालावधी ११ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.
पनवेल-सीएसएमटी : रात्री ९.५२, १०.५८, पहाटे ४.०३, ५.३१
सीएसएमटी-पनवेल : रात्री ११.१४, १२.२४, पहाटे ५.१८, सकाळी ६.४०
पनवेल-ठाणे : रात्री ११.१८, पहाटे ४.३३, ४.५३
ठाणे-पनवेल-नेरुळ : रात्री ९.३६, १२.०५, पहाटे ५.१२, ५.४०
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.