
मुंबई : उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक (mega block) घेण्यात येणार आहे. माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने (central railway) दिली आहे. ब्लॉककालावधित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून सुटणाऱ्या डाउन जलद सेवा या सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३९ या वेळेत माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान गाड्या त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबणार असून निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचणार आहेत. ठाण्याच्या पलीकडे या जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.
हे देखील पाहा -
हार्बर लाइनवर 'असा' असेल ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक - चुनाभट्टी/ वांद्रे डाउन हार्बर लाईनवर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/ वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत हा मेगाब्लॉक राहणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड स्थानकावरून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल स्थानकाकरिता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.
पनवेल ते कुर्लादरम्यान 'या' वेळेत विशेष रेल्वे सेवा
या ब्लॉक कालावधित पनवेल ते कुर्ला स्थानकादरम्यान विशेष रेल्वे सेवा चालविण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. मेगाब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मुख्य मार्ग
स्थानक - माटुंगा ते मुलुंड
मार्ग - अप आणि डाउन जलद
वेळ - सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५
हार्बर लाइन रेल्वे मार्ग
स्थानक - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे
मार्ग - डाउन आणि अप
वेळ - सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४०
Edited By - Vishal Gangurde
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.