'नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा'; मेहबूब शेखांचा चित्रा वाघ यांच्यावरती घणाघात (पहा व्हिडीओ)

“मी वाघ आहे वाघ, माझ्यावर कोल्हे कुत्रे भुंकत आहेत. पण मी कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही”,
'नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा'; मेहबूब शेखांचा चित्रा वाघ यांच्यावरती घणाघात (पहा व्हिडीओ)
'नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा'; मेहबूब शेखांचा चित्रा वाघ यांच्यावरती घणाघात (पहा व्हिडीओ)SaamTV

मुंबइ : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आणि भाजप BJP नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये चांगलाच शाब्दीक वाद सुरु झाला आहे. याच कारण आहे काल मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावरती केलेली बोचरी टीका. "लाचखोर नवऱ्याची बायको’, अशी तुमची ओळख आहे आणि 'नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा'; महिलांचा आदर आम्हाला काय शिकवताय" राष्ट्रवादी हा पक्षच मुळी महिलांचा आदर करणारा आहे नीतिमत्ता शिकवायची आपल्या घरी शिकवा" अशा खरमरीत शब्दात महेबूब शेख Mahboob Sheikh यांनी टीका केल्याने चित्रा वाघ Chitra Wagh यांच्या ती चांगलीच जिव्हारी लागली आणि वाघ यांनी देखील आपल्या ट्विटरवरुन Tweet मेहबूब शेख यांना त्यांच्या शैलीतच प्रत्युतर दिलं आहे. Mehboob Sheikh's criticism of Chitra Wagh

पहा व्हिडीओ-

“मी वाघ आहे वाघ, माझ्यावर कोल्हे कुत्रे भुंकत आहेत. पण मी कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही”, अशा शब्दात त्यांनी महेबूब शेखांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच "मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते म्हणून सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले, आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू केली आहे पण 'मी काय आहे काय नाही' हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या" अशा परखड शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनीही शेखांना उत्तर दिलं आहे.

आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही,

मी कशी आहे ते तुमच्या बापाला जाऊन विचारा या वाघ यांच्या ट्विट मधील शब्दांचा शेख यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून FaceBook Post उत्तर दिलं आहे.

'आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही, आणि बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही , आणि तुम्ही काय आहात हे आम्ही पाहीलं आहे कुणाला विचारायची आवश्यकता नाही. सध्या या दोघांमध्ये सुरु असणाऱ्या सोशल मिडीया वॉरची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

का सुरु झाला वाद...

पारनेरच्या महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंवरती केलेल्या आरोपांमुळे लंके अडचणीत सापडले होते. दरम्यान या प्रकरणामध्ये चित्रा वाघ यांनी उडी घेतली आणि निलेश लंकेवरती अनेक आरोप केले होते तसेच लंकेविरोधात आक्रमक भूमिकाही घेतली होती दरम्यान याच आरोपांना उत्तर देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी काल पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत असताना ‘लाचखोर नवऱ्याची बायको’, अशी तुमची ओळख आहे आणि 'नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा'; महिलांचा आदर आम्हाला काय शिकवताय' अशा शब्दात टीका केली होती आणि यावरुणच हा वाद निर्माण झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com