"एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही" - संजय राऊत

"एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण करणं शक्य नाहीये, हे सुधीर मुनगंटीवार यांनीच अर्थमंत्री असताना सांगितलं होतं." असं राऊत म्हणाले आहेत.
"एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही" - संजय राऊत
"एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही" - संजय राऊतSaam Tv

मुंबई: राज्यात विविध मागण्यांसाठी एसटी कर्मकाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाचा आजचा चौथा दिवस असून हे आंदोलन आणखीनच चिघळलं आहे, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करा ही प्रमुख मागणी संपकऱ्यांची आहे. एसटी संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम असताना शिवसेना खासदार संजय राऊतांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा दाखला देत राऊत म्हणाले की, "एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण करणं शक्य नाहीये, हे सुधीर मुनगंटीवार यांनीच अर्थमंत्री असताना सांगितलं होतं." असं राऊत म्हणाले आहेत. ("Merger of ST Corporation is not possible" - Sanjay Raut)

हे देखील पहा -

पुढे राऊत म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातातील बाहुले बनू नये. संपापेक्षा, कामगारांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा भाजपला महाविकास आघाडीच्या बदनामीचं पडलंय. एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही. भाजपमधील उपरे नाचताहेत, तर नाचू देत. सरकार कामगारांच्या बाजूनं आहे, असंही ते म्हणाले आहेत. राज्याचे माजी अर्थमंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा एक जुना व्हिडिओ शिवसेनेने शेयर केला आहे. ज्यात मुनगंटीवार बोलतायत की "एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण नाही" याच व्हिडिओचा आधार घेत संजय राऊतांनीही एसटीचे विलीनीकरण शक्य नसल्याचं म्हटलं आहे.

भाजपच्या संपाला पाठिंब्याबाबत राऊत म्हणाले की, भाजप राजकारण करत आहे. एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीनीकरण करणं शक्य नाहीये, हे सुधीर मुनगंटीवार यांनीच अर्थमंत्री असताना सांगितलं होतं. याक्षणी ते शक्य नाहीये तरीही भाजपचे नेते मुद्दाम हा विषय घेऊन नाचत आहेत. शेवटी राज्याचे सरकार कामगारांच्या बाजूने उभे आहे. अनेक बंधने सरकारवर आहेत. त्यामुळे कामगारांनी हे समजून घेतलं पाहिजे.

द्वारकेत ड्रग्स प्रकरणी राऊत म्हणाले की, द्वारकेत ड्रग्स सापडणे चिंतेचे गोष्टी आहे. राज्यात पाव ग्रँम सापडले. आता वानखेडेंनी तिकडे पाहावे. असं म्हणत त्यांनी समीर वानखेडेंवरही निशाणा साधला. नाशिकमधील साहित्य संमेलनाबाबत ते म्हणाले की, आम्ही कुसुमाग्रज वाचतो. बर्नाड शॉचा दाखला फडणवीसांनी दिला आहे. या निमित्ताने लोक वाचायला लागले. यंदाचे साहित्य संमेलन बहारदार होईल.

"एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही" - संजय राऊत
"फडणवीस लेखी माफी मागा" निलोफर मलिक-खान यांची फडणवीसांना अब्रू नुकसानीची नोटीस

तर नवाब मलिक यांचं समर्थन करत राऊत म्हणाले की, चिखलफेक कोण करतंय हे जनतेला माहिती आहे. नवाब मलिक यांना मंत्रिमंडळाने पाठिंबा दिला आहे. या लढाईला नैतिक बळ मिळालंय. शेवटी विजय सत्याच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास आहे. उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. लवकरच ते सेवेत रुजू होतील, चिंतेची स्थिती नाही अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com