Meteorological Department Replied to Ajit Pawar
Meteorological Department Replied to Ajit Pawarsaam tv

अजित पवार यांच्या टीकेला हवामान विभागाचे प्रत्युत्तर; होसाळीकर म्हणाले...

सध्या हवामान खात्याचे अंदाज फार चुकायला लागले आहेत, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते. यावर आता हवामान विभागाने उत्तर दिले आहे.

सचिन जाधव

पुणे : हवामान खात्याने रेड अलर्ट दिला अन् पावासाचा एक थेंब नाही. हे काही बरोबर नाही. हवामान खाते ज्यावेळी रेड अलर्ट देते, त्यावेळी त्या इशाराची दखल प्रशासन घेते. त्यानंतर शाळांना देखील सुट्टी वगैरे दिली जाते. पण सध्या हवामान खात्याचे अंदाज फार चुकायला लागले आहेत, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते. यावर आता हवामान विभागाने उत्तर दिले आहे. (Meteorological Department Replied to Ajit Pawar)

Meteorological Department Replied to Ajit Pawar
गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता ?' पुस्तकावरून नवा वाद; मेधा पानसरे म्हणाल्या...

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज हवामान विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याविषयी पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हवामान विभाग जे काही अंदाज वर्तवत असते, त्यातील अंदाज बऱ्यापैकी बरोबर असतात, असे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात तीन दिवसांसाठी रेड अलर्ट देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती.तर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्या काळात पाऊस पडलाच नाही. त्यामुळे अजित पवारांनी हवामान विभागावर टीका केली.

Meteorological Department Replied to Ajit Pawar
Rahul Shewale। महाराष्ट्र सदनात बाळासाहेबांचा पुतळा उभारा; पाहा काय बोलतायेत राहुल शेवाळे

त्यावर उत्तर देताना होसाळीकर म्हणाले, हवामान विभागाने दिलेल्या सूचना नीट वाचल्या जात नाहीत. हवामान विभागाने फक्त घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता.तो बऱ्यापैकी पूर्ण झाला. हवामान विभागाकडे बऱ्यापैकी यंत्रसामग्री असून केंद्र सरकार पुरेपूर निधी वेळोवेळी हवामान विभागाला देत असते. पुढच्या पंचवीस वर्षाचे नियोजन हवामान विभागाकडे तयार आहे'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com