
मुंबई : मुंबईतील नोकरदार वर्गासाठी लोकल ट्रेन महत्वाची आहे. मुंबई मेट्रो देखील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा महत्त्वाचा पर्याय आहे. मुंबई मेट्रो प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या म्हणजेच 19 जानेवारीला मुंबई मेट्रोची घाटकोपर ते वर्सोवा ही सेवा बंद राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर आहेत. नेमकं याच दिवशी मुंबईची मेट्रो सेवा संध्याकाळी 5.45 ते 7.30 वाजेदरम्यान बंद राहणार आहे. संध्याकाळी ऑफिस सुटण्याची ही वेळ असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र मेट्रो सेवा बंद असल्याने मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेट्रो 2-A आणि मेट्रो 7 चे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यात अनेक मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. मुंबई मेट्रो 2A आणि मेट्रो 7 च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या टप्प्याचे उद्घाटन गेल्या वर्षीच झाले होते. दोन्ही मार्गांवर पहिल्या टप्प्यात 20 किलोमीटर अंतरापर्यंत मेट्रो सुरू करण्यात आली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.
मेट्रो 2A आणि 7 चे मार्ग
मुंबई मेट्रो 2A चा मार्ग 18.5 किलोमीटर लांबीचा आहे. मेट्रो 2A चा मार्ग दहिसर पश्चिम ते डीएन नगर असा आहे. या मार्गावरील दहिसर पूर्व, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड पश्चिम, लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव पश्चिम, ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर ही स्थानके आहेत. आहेत.
मेट्रो 7 मध्ये एकूण 14 स्थानके असतील. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपारा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे, गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) स्थानके येतील. पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व ते आरेपर्यंत मेट्रो सुरू झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.