MHADA Konkan Lottery 2023: घराचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडायच्या ४,०८३ घरांसाठी उद्यापासून नोंदणी सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती

घराचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडायच्या ४,०८३ घरांसाठी उद्यापासून नोंदणी सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती
MHADA Konkan Lottery 2023
MHADA Konkan Lottery 2023Saam Tv

>> संजय गडदे

MHADA Konkan Lottery 2023: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांचे स्वप्न पूर होणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे विविध उत्पन्न गटांसाठी ४०८३ घरांसाठीच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी २२ मे पासून अर्ज नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणा-स्वीकृतीला दुपारी तीन वाजेपासून प्रारंभ होणार आहे.

अर्जांची संगणकीय सोडत १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

MHADA Konkan Lottery 2023
Sukanya Samriddhi Yojana: दररोज फक्त 333 रुपये गुंतवून तुमच्या मुलीचे भविष्य करा सुरक्षित, जाणून घ्या संपूर्ण माहिती

विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व सदनिकांबाबत माहिती म्हाडाचे अधिकृत संकेत स्थळ  https://housing.mhada.gov.in तसेच https://www.mhada.gov.in  यांवर प्रसिद्ध करण्यात आली. इच्छुक अर्जदारांनी सहभाग घेण्याकरिता याच संकेत स्थळांचा वापर करावा, असे आवाहन मिलिंद बोरीकर यांनी केले आहे. (Latest Marathi News)

एकूण सदनिका ४०८३

अत्यल्प – २७९०

अल्प – १०३४

मध्यम – १३९

उच्च – १२०

सोडतीमधील अत्यल्प उत्पन्न गटात पहाडी गोरेगाव पश्चिम येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील १९४७, अ‍ॅन्टॉपहिलमधील ४१७ तर, विक्रोळीच्या  कन्नमवार नगरमधील ४२४ अशी एकूण २७८८ सदनिका समाविष्ट आहेत. 

MHADA Konkan Lottery 2023
Telangana News: दुःखद! जन्मदिनीच विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, मृतदेहाजवळ आई-वडिलांनी कापला केक

मध्यम उत्पन्न गटासाठी मंडळाने १४० सदनिका उपलब्ध करून दिल्या असून या सदनिका उन्नतनगर गोरेगाव पश्चिम, महावीर नगर कांदिवली, जुहू, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, सहकार नगर चेंबुर, लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, भायखळा, टिळकनगर चेंबुर, चांदिवली पवई, गायकवाड नगर मालाड, प्रतीक्षा नगर सायन, चारकोप कांदिवली येथे आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी १२० सदनिकांचा समावेश असून या सदनिका जुहू अंधेरी पश्चिम, वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, शिंपोली कांदिवली, तुंगा पवई, चारकोप कांदिवली, सायन पूर्व येथे आहेत. 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com