Pune Mhada Lottery: म्हाडा पुणे मंडळातर्फे ५९९० सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर, नव्या प्रक्रियेनुसार काय बदल असणार?

नवीन आज्ञावली नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरणार आहे कारण अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात
Pune Mhda
Pune MhdaSaam TV

पुणे : म्हाडा पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५९९० सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांच्या हस्ते आज करण्यात आला. म्हाडातर्फे तयार करण्यात आलेले IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management system) या नूतन संगणकीय ऍपचा वापर करणारे पुणे मंडळ हे म्हाडाचे सर्वात पहिले मंडळ आहे.

नव्या प्रक्रियेनुसार नोंदणीकरणा दरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार हे म्हाडाच्या विविध मंडळांच्या संगणकीय सोडतीतील कायमस्वरूपी पात्र अर्जदार ठरणार असून पुणे मंडळाच्या सदनिकांची संगणकीय सोडत १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता नेहरू मेमोरियल हॉल येथे काढण्यात येणार आहे.

Pune Mhda
MHADA Lottery: म्हाडाची घरे घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; म्हाडानं लॉटरी प्रक्रियेत केले बदल

IHLMS 2.0 या नूतन संगणकीय ऍपच्या साहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस आज दुपारी १२.०० वाजेपासून सुरवात झाली. आज सायंकाळपर्यंत सुमारे ४४०० अर्जदारांनी नोंदणी प्रक्रियेस सुरवात केली आहे. नवीन आज्ञावली नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरणार आहे कारण अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. (Latest Marathi News)

नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या ऍपच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम च्या साहाय्याने आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतात. 

अर्जदारांच्या सोयीकरिता  https://housing.mhada.gov.in  या म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध  करून देण्यात आली आहे. तसेच येथे अॅप डाउनलोड करण्याची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहितीपुस्तिका, व्हिडीओस, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

IHLMS 2.0 या संगणकीय ऍप अंतर्गत अर्ज नोंदणी जरी अमर्याद काळ सुरु राहणार असली तरी पुणे मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदार ०५ फेब्रुवारी, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकतात. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या ऍप वरून निष्क्रिय करण्यात येणार आहे.  दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२३  रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील, तसेच दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशाप्रकारे सर्व कागद पत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच या ऍप द्वारे पात्र ठरविले जातील व सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी १५ फेब्रवारी, २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर केली जाणार आहे.  

Pune Mhda
Urfi Javed Controversy: उर्फी की बर्फी कोण-काय...; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा चित्रा वाघांवर निशाणा

दिनांक १७ फेब्रुवारी रोजी पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे. नूतन सोडत संगणकीय सोडत प्रणालीचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे यशस्वी अर्जदारांना आपल्या सदनिकेचे तात्पुरते देकार पत्र पुढील दोन दिवसांतच ऑनलाईन ऍपमध्ये प्राप्त होणार आहे .  

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५९९० सदनिकांपैकी २९०८ सदनिका या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील असल्याने संगणकीय सोडतीत त्यांचा समावेश असणार नाही.  तसेच  म्हाड कायद्यातील तरतुदींनुसार प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील सदनिकांची तिसरी सोडत असून पात्रतेचे निकष यांकरिता लागणार नाहीत. अर्जदाराने अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर त्यांना तात्पुरते देकार पत्र  दिले जाईल. सदनिकेची किंमत पूर्ण भरल्यानंतर ताबा प्रक्रिया लगेच सुरु करण्यात येणार आहे. 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com