शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली; संजय राऊतांनी दिली माहिती

राजनैतिक भाव कोणाला कमी लेखण्यासाठी जात असेल तर प्रभू राम पावणार नाहीत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली; संजय राऊतांनी दिली माहिती
Sanjay RautSaam Tv

मुंबई : मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सुरु असतानाच आता शिवसेनेनं अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या संबंधी माहिती दिली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे १० जून ला अयोध्येला जाणार आहेत. हा दौरा राजकीय नाही. ही आमची श्रध्दा आहे. सध्या अयोध्येत शिवसेनेची तयारी सुरु आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. जो कोणी नकली भाव, राजनैतिक भाव कोणाला कमी लेखण्यासाठी जात असेल तर प्रभू राम पावणार नाहीत. म्हणून त्यांना विरोध होतो, असा टोलाही संजय राऊत यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव न घेता लगावला.

Sanjay Raut
Pune | भोंगे काढू पण अमित ठाकरे आल्यावरचं !;सामाजिक कार्यकर्त्यांचे राज ठाकरेंना पत्र

उत्तर प्रदेशमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधात बॅनर लावले आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, उत्तर प्रदेशची जनता सुजाण आहे. कोणी विरोध करत असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे. खासदार नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. ही अटक बेकायदेशीर असल्याची तक्रार नवनीत राणा यांनी केली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, त्यांच्या तक्रारीत काही ताकत असेल तर देशातील कोणत्याही नागरीकाला तक्रार करण्याचा अधिकार आहे. ठाकरे सरकार दबावाखाली काम करत नाही उलट त्यांचा दबाव असतो, असंही राऊत म्हणाले.

फडणवीस यांनी राणा यांच्या अटकेवरून ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर जोरदार टीका केली. “नवनीत राणा यांची तब्येत स्थिर होत आहे. पण ज्याप्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली ती अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारांनीही जी वागणूक दिली जात नाही तशाप्रकारची वागणूक त्यांना देण्यात आली आहे. या सरकारने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या असे माझे मत आहे, असे फडणवीस म्हणाले होते. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, कौर्याची व्याख्या बदलावी लागेल देशातील गेल्या ७ वर्षातील आणि महाराष्ट्राची ५ वर्षे अनेक घटनांचा अभ्यास केला तर कौर्या समजून घ्यावे लागेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.