शिवसेनेला आणखी एक झटका! एक मंत्री आणि चार आमदार गुवाहाटीत पोहचले

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे.
शिवसेनेला आणखी एक झटका! एक मंत्री आणि चार आमदार गुवाहाटीत पोहचले
Eknath Shinde Saam Tv News

मुंबई: राज्यात शिवसेना (ShivSena) आमदारांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४२ आमदारांनी बंड केले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीमधील एका हॉटेलमध्ये आहेत. आज पुन्हा पाच आमदार गुवाहाटीत गेले आहेत. मंत्री दादा भुसे आणि आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय राठोड, अपक्ष आमदार गीता जैन, किशोर जोडगेवार हे आता गुवाहाटील पोहोचले आहेत.

शिवसेनेचे आमदार कृषी मंत्री दादा भुसे, आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) आणि आमदार रवींद्र फाटक गुवाहाटी येथील रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले आहेत, त्यांनीही आता एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आता शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde Live Updates: एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आदारांना निलंबित करा; शिवसेना लीगल टीमने उपाध्यक्षांकडे दिली यादी

बीएमसी निवडणुकीआधी बंड होईल याची कल्पना होती

राज्यात शिवसेना (ShivSena) आमदारांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४२ आमदारांनी बंड केले आहे, त्यामुळे आता राज्यातील सरकार अडचणीत आले आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'मुंबई महापालिका निवडणुकांच्या अगोदर अस होणार याची आम्हाला कल्पना होती, अस पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)म्हणाले.

Eknath Shinde
कोणाला घाबरवताय, तुमच्या असल्या धमक्यांना भीक घालत नाही - एकनाथ शिंदे

आमचा अंदाज असा होता की, मुंबई महापालिकाअगोदर अस काहीतरी होणार. शिवसेनेला संपवून मुंबई महापालिकेवर सरकार आणणे महत्वाचे आहे, यासाठी दिल्लीच्या सूचनेवर हे सगळं करण्यात आले आहे. कारण मुंबई महापालिका सर्वात मोठी महापालिका आहे, म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) दिल्लीवरुन आदेश घेऊन येत होते.

या अंदाजामुळे आम्ही सावध होतो, पण त्यांनी मोठा खेळ केला. ईडीचा (ED) वापर करुन आमदारांना फोडले, लोकशाहीला काळीमा लावण्याचे काम केले आहे. शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर बोलताना चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, अजून या संदर्भात आमच्यात काही चर्चा झालेली नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com