
Ramdas Athawale News : संजय राऊत आमच्या यात्रेत सहभागी होत नाही, ते भारत जोडो यात्रेत सहभागी होतात. त्यामुळे त्यांनी आणखी २०-२५ वर्ष विरोधी पक्षातच राहावं, असं म्हणत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. रामदास आठवले हे उल्हासनगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी हा टोला लगावला आहे. (Latest Marathi News)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे जम्मूमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. आज पहाटेच संजय राऊत राहूल गांधींसह यात्रेत सहभागी झाले. यात्रेत सहभागी होताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संजय राऊतांची गळाभेट घेत त्यांचे यात्रेत स्वागत केले. (Maharashtra Political News)
आज दुपारी संजय राऊत पाकव्याप्त काश्मीरमधील शिष्टमंडळ तसेच, शिख समुदायाच्या शिष्टमंडळाशी भेट घेणार आहेत. संजय राऊत यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. यावर रामदास आठवले यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, राऊत यांनी २०-२५ वर्ष विरोधातच राहावं, असा खोचक टोला रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लगावला आहे.
'धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळणार'
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज शिवसेना उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट यांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. यावेळी सोमवारी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याबाबत रामदास आठवले यांना विचारलं असता, एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० आमदार आणि १३ खासदार आहेत. त्यामुळे 'धनुष्यबाण' हे चिन्ह त्यांनाच मिळेल असा आम्हाला विश्वास आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.