Uday samant : मुंबई महानगरपालिकेत पैसे खाणारे कोण बोके होते?; उदय सामंतांचे शिवसेनेला प्रत्युत्तर

उदय सामंत यांनी शिवसेनेने केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Uday samant
Uday samant saam tv

रुपाली बडवे

Uday samant News : 'अडीच वर्षात जे जमलं नाही, ते अडीच महिन्यात झालं. २० दिवसांपूर्वी आमची बैठक झाली होती. मागच्या सरकारमध्ये केवळ फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर जात होती. मुंबई महानगरपालिकेत पैसे खाणारे कोण बोके होते ? असा सवाल करत मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी शिवसेनेने (Shivsena) केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Uday samant
MNS VS Shinde Group : शिंदे गटाचा मनसे फोडण्याचा प्रयत्न; मनसे नेत्याचा गंभीर आरोप

जेष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सेना नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली जात आहे. शिंदे गटातील नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. याचदरम्यान, शिवसेनेने केलेल्या टीकेला मंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

उदय सामंत म्हणाले, 'अडीच वर्षात जे जमलं नाही, ते अडीच महिन्यात झालं. २० दिवसांपूर्वी आमची बैठक झाली होती. मागच्या सरकारमध्ये केवळ फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर जात होती. मुंबईत महानगरपालिकेत पैसे खाणारे कोण बोके होते ? आम्ही सुद्धा शिव्यांची 'पीएसडी' केली आहे. आम्ही केवळ शिंदेंना पाठिंबा दिला म्हणून गद्दार का ? एकही रुपया मी घेतला असेल तर दाखवून द्या'.

Uday samant
Bacchu Kadu : बच्चू कडूंनी कार्यकर्त्याच्याच कानशिलात लगावली? स्पष्टीकरण देत म्हणाले...

'वेदांता' प्रकल्प गुजरातला का गेला ? पत्रकाराच्या या प्रश्नावर भाष्य करताना मंत्री सामंत म्हणाले, 'वेदांता' प्रकल्प राज्यात आलाच नव्हता. कुठेच सही झालेली नाही, कोणतीही जमीन दिलेली नाही. उद्या 'एमआयडीसी' बोर्डाची बैठक आहे. मला उद्योग खातं कळत नाही, अशी टीका माझ्या करण्यात येते. पण जमीन घेणं आणि विकणं एवढंच नाही तर रोजगार निर्मिती करणं हे देखील महत्वाचं आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com