पुण्यात खळबळ! आठ वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या, २० कोटींची खंडणी मागितली अन्...

पिंपरी-चिंचवड मध्ये धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे.
Pune crime update
Pune crime updateSaam Tv

पुणे : पिंपरी-चिंचवड मध्ये धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. प्रेम प्रकरणाला विरोध होत असल्याने रागाच्या भरात एका तरुणाने आठ वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केली. आदित्य ओगले असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. सदर इसमाने वीस कोटींची खंडणी घेण्यासाठी अल्पवयीन मुलाचं अपहरण केलं होतं. ही धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-chinchwad) घडल्याने पुणे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मंथन भोसले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. (Minor children abducted and killed for twenty crore extortion)

Pune crime update
अदर पूनावाला यांच्या नावाने बनावट व्हाट्सअप संदेश; सिरम इन्स्टिट्यूटची १ कोटींची फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मंथनने आदित्यचं गुरुवारी अपहरण केलं होतं. आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल पोलिसांत दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या गंभीर प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. पोलिसांनी मंथनची चौकशी सुरु केली असता त्याच्याकडून संशयास्पद प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे पोलिसांनी मंथनची कसून चौकशी केल्यानंतर केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याने कबुली दिली. पैशांच्या हव्यासापोटी मंथनने आदित्यची हत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता.

Pune crime update
शिंदे सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; राज्यात लवकरच मुख्यमंत्री किसान योजना

मात्र, खंडणी उकळण्यासाठी मंथनने हा धक्कादायक प्रकार केला असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. आदित्यच्या कुटुंबीयांचा बदला घेण्याच्या भावनेतून हे कृत्य केल्याची कबुली मंथनने दिली. आदित्यची नातेवाईक असलेल्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता आणि याच रागातून आदित्यची हत्या केली असावी, अशी शक्यता आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी दिली.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com