Pune Crime -मित्राने केला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

या प्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबियांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये तकार दाखल केल्यानंतर आरोपी तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
Pune Crime -मित्राने केला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
Pune Crime -मित्राने केला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचारSaam Tv

पुणे - शहरात  एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलावर मित्रानेच अनैसर्गिक अत्याचार  (Sexual assault) केल्याची घटना घडली आहे. ही घटना दांडेकर पूल परिसरात घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबियांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये तकार दाखल केल्यानंतर आरोपी तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 

हे देखील पहा -

प्राप्त माहितीनुसार, अल्पवयीन मुलाला स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार  करण्यात आला आहे. आपल्या मित्राला भेटण्यासाठी १६ वर्षीय मुलगा दांडेकर पूल परिसरात गेला होता. हा १६ वर्षीय मुलगा तळजाई पठार येथे राहणारा होता. यावेळी १६ वर्षीय मुलाला त्याचा जुना मित्र सागर सोनवणे त्या ठिकाणी भेटला. त्यानंतर सागरने पीडित मुलाला जवळच असलेल्या एका स्वच्छतागृहात नेले.

Pune Crime -मित्राने केला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
कोकणात उदय सामंतांचे पुन्हा वर्चस्व

यानंतर अल्पवयीन मुलाला मारहाण करत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. या घटनेनंतर पीडित मुलगा आपल्या घरी गेला आणि कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितला. ससून रुग्णालयात पीडित मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. तर, पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com