
मुंबई: मुंबईमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासला आहे. कोचिंग क्सासमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिच्याच शिक्षकाने विनयभंग केल्याची संतापजनाक घटना मुंबईतील (Mumbai) भायखळ्यामध्ये घडली आहे. (Minor Girl abuse by the teacher in Byculla, Mumbai)
हे देखील पहा -
मिळालेल्या माहितीनुसार ही १७ वर्षीय विद्यार्थिनी आरोपी शिक्षकाच्या कोचिंग क्लासेसमध्ये (Coaching Classes) शिकवणीसाठी येत होती. शुक्रवारी अल्पवयीन मुलगी (Minor Girl) ही शिकवणीसाठी आली असताना शिक्षकाने तिच्याशी जबरदस्ती (Abuse) करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी (Byculla Police) विनयभंग आणि पोस्को (Posco) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षक किशोर जाधव (वय - २९) याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.