Mumbai Crime : अल्पवयीन मुलीचा स्कूलबसमध्ये विनयभंग, नराधमाकडून जीवे मारण्याची धमकी

पीडित मुलगी ही ऐरोली येथील शाळतून स्कूलबसने घरी परतत असताना हा प्रकार घडला
Crime News Latest News
Crime News Latest NewsSAAM TV

Mumbai Crime News : मुंबईत (Mumbai) चालत्या स्कूलबसमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळा सुटल्यावर मुलगी घरी जात असताना हा प्रकार घडला आहे. तसेच या घटनेची माहिती कोणाला दिल्यास जिवेमारण्याची धमकी या पीडित मुलीला चालकाकडून देण्यात आली होती. (Mumbai Latest Crime News)

गुरूवारी पीडित मुलगी ही ऐरोली, नवी मुंबई येथील शाळतून स्कूलबसने घरी परतत असताना, चालत्या बसमध्ये आरोपीने मुलीला चुकीचा स्पर्श केला. तसेच याबाबत कुणालाही न सांगण्यासही त्याने धमकावले. घरी परतल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती तिच्या कुटुंबियांना दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

Crime News Latest News
शिंदे-फडणवीस सरकारचा 'मविआ'ला दणका; पर्यटन विभागाच्या शेकडो कोटींच्या कामाला स्थगिती!

पीडितेच्या पालकांनी या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदवत चालकाला अटक केली आहे. सूरज भालेराव असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी सूरज भालेराववर ३५४, ५०६ भा द वी कलमांसह ८,१२ पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत.

ट्यूशन्स टिचरने केला विद्यार्थीनीचा विनयभंग

तर दुसरी घटना विक्रोळी भागात घडली आहे. एका ट्यूशन्स टिचरनेच अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना विक्रोळी येथील सुर्यानगर येथे घडली आहे. अल्पवयीन विद्यार्थीनीला एकटचं ट्युशनला बोलवून तिच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न करत, शिक्षकाने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

मात्र वेळीच विद्यार्थीनीने शिक्षकाला धक्का मारून तेथून पळ काढला. घडलेल्या प्रकाराची माहिती मुलीने कुटुंबियांना सांगितल्यानंतर हा प्रकार पुढे आला. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांत मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शिक्षकावर 354ए(1) (आय),509 भादवी सह कलम 8,12 पोक्सों नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी ट्यूशन टिचर चंद्रशेखर जोगू याला अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com