Breaking आमदार गणेश नाईकांना हायकोर्टाचा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

Ganesh Naik: ठाणे सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.
Breaking आमदार गणेश नाईकांना हायकोर्टाचा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर
Ganesh Naik SaamTvNews

मुंबई: आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. भाजप नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज बुधवारी सकाळी ११ वाजता तातडीची सुनावणी झाली. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यासमोर ही सुनावणी घेतली.

भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर नवी मुंबईतील (Navi Mumbai) एका महिलेकडून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.

Ganesh Naik
Breaking गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार; कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळला

एका महिलेने आपण गेल्या २७ वर्षांपासून गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत त्यांच्यापासून आपल्याला एक मुलगा झाला असून त्याचे वय १५ वर्ष आहे. हा मुलगा ५ वर्षांचा झाल्यानंतर मुलाचा आणि त्याच्या आईचा आपण अधिकृतपणे स्वीकार करू असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र नंतर नाईक यांनी आपला शब्द पाळला नाही आणि आपली फसवणूक केल्याचा संबंधीत महिलेकडून करण्यात आला आहे. तसंच आपल्यावर जबरदस्ती करून वारंवार अत्याचार, केले शिवाय जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याची तक्रार या महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात केली. यानंतर पोलिसांनी नाईक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. शिवाय या प्रकरणाची नोंद राज्य महिला आयोगाने घेतली होती. आश्चर्य़ाची बाब म्हणजे आरोप करणाऱ्या पीडित महिलेने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करणार असल्याच काही दिवसांपुर्वी माध्यमांसमोर सांगितलं आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.