Breaking गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार; कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळला

गणेश नाईक यांच्यावर बलात्कार अणि धमकावणे अशा प्रकारचे दोन गुन्हे दाखल आहेत.
Ganesh Naik
Ganesh Naik SaamTvNews

मुंबई: भाजपचे (BJP) नेते आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यासमोरील अडचणी काही थांबण्याचं नावं घेत नाही. आज नाईक यांचा ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. गणेश नाईक यांच्यावर बलात्कार अणि धमकावणे अशा प्रकारचे दोन गुन्हे दाखल आहेत. नाईक यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.

आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यांनी ठाण्यातील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. नेरुळ पोलिसांनी नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. नाईक यांच्या विरोधात एका महिलेला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर (CBD Belapur) पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या गुह्याला 24 तास उलटत नाही तोच त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने या दोन्ही गुन्ह्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी 2 अर्ज दाखल केले होते.

Ganesh Naik
भाजप आमदार गणेश नाईक यांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव, न्यायालयात अर्ज दाखल

काय आहे प्रकरण?

एका महिलेने गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर आरोप केले आहेत. महिलेने सांगितल्यानुसार, ते दोघे गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. तसेच नाईक यांच्यापासून आपल्याला एक मुलगा झाला असून त्याचे वय पंधरा वर्ष आहे. नाईक यांनी त्या महिलेला ग्वाही दिली होती की, हा मुलगा पाच वर्षांचा झाल्यानंतर मुलाचा आणि त्याच्या आईचा आपण अधिकृतपणे स्वीकार करू. मात्र नंतर नाईक यांनी आपला शब्द पळाला नाही आणि त्या महिलेची फसवणूक केली. त्यानंतर नाईकांकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध केला. मात्र, नाईक यांनी आपल्यावर जबरदस्ती करून वारंवार अत्याचार केला, अशी तक्रार पीडित महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात केली. यानंतर पोलिसांनी नाईक यांच्या विरोधात शनिवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Ganesh Naik
गणेश नाईक प्रकरण; चंद्रकांत पाटील म्हणाले, कोर्टाकडून न्याय मिळेल

ठार मारण्याची धमकी

महिलेने दाखल केलेल्या अर्जात मागणी केली होती की, नाईक आणि त्यांचा मुलगा आता 15 वर्षांचा आहे, मात्र नाईक त्यांचे पितृत्व स्वीकार करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यामुळे या महिलेकडून आपल्या हक्काची मागणी होऊ लागल्यानंतर गणेश नाईक यांनी मार्च 2021 मध्ये तिला बेलापूर येथील सेक्टर-15 मधील आपल्या कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यावेळी महिलेने नाईक यांना विनंती केली होती की, आपल्या मुलाला स्वीकारा. परंतु नाईक यांनी या महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तिला ठार मारण्याची धमकी दिली. महिलेच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री गणेश नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस (Police) निरीक्षक अनिल पाटील करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com