आमदार गणेश नाईकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; पीडित महिला जाणार सर्वोच्च न्यायालयात

आज मुंबई उच्च न्यायालयाने गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.
आमदार गणेश नाईकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; पीडित महिला जाणार सर्वोच्च न्यायालयात
ganesh naiksaam tv

मुंबई: भाजप (BJP) आमदार गणेश नाईक यांना मुंबई उच्च न्यायलयाने दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. पण आता पुन्हा नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या निर्णयाविरोधात सर्वाच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पीडितेच्या वकीलांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पुन्हा आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. भाजप नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज बुधवारी सकाळी ११ वाजता तातडीची सुनावणी झाली. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यासमोर ही सुनावणी घेतली.

ganesh naik
Breaking गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार; कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला असला तरी या निर्णयाविरोधात पीडिता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. गणेश नाईक (Ganesh Naik) प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे होत नसल्याचा आरोप करत पीडितेच्या वकिलांनी गणेश नाईक यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यापासून भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या सर्व बाबी आम्ही सर्वोच्च न्यायालयात मांडणार असल्याचे पीडितेच्या वकीलांनी म्हटले आहे.

एका महिलेने आपण गेल्या २७ वर्षांपासून गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत त्यांच्यापासून आपल्याला एक मुलगा झाला असून त्याचे वय १५ वर्ष आहे. हा मुलगा ५ वर्षांचा झाल्यानंतर मुलाचा आणि त्याच्या आईचा आपण अधिकृतपणे स्वीकार करू असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र नंतर नाईक यांनी आपला शब्द पाळला नाही आणि आपली फसवणूक केल्याचा संबंधीत महिलेकडून करण्यात आला आहे. तसंच आपल्यावर जबरदस्ती करून वारंवार अत्याचार, केले शिवाय जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याची तक्रार या महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात केली. यानंतर पोलिसांनी नाईक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. शिवाय या प्रकरणाची नोंद राज्य महिला आयोगाने घेतली होती.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.