आपत्तीमुळे शहरातील पुरग्रस्तांना नुकसान भरपाई द्या - आमदार गणपत गायकवाड

दिवसापासुन सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे.
आपत्तीमुळे शहरातील पुरग्रस्तांना नुकसान भरपाई द्या - आमदार गणपत गायकवाड
आपत्तीमुळे शहरातील पुरग्रस्तांना नुकसान भरपाई द्या - आमदार गणपत गायकवाड Saam Tv

प्रदिप भणगे

कल्याण :- कोरोना महामारीमुळे (Coronavirus) राज्यातील अनेक उद्योग धंदे ठप्प झालेले आहेत. बहुतांश नागरिकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत व अनेकांच्या पगारात कपात झालेली असल्यामुळे नागरिक आर्थिक संकटात सापडलेले आहेत. असे असताना गेल्या काही दिवसापासुन सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठाणे जिल्हयातील (Thane District) कल्याण शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने गोर-गरीब नागरिकांच्या घरातील बहुतांश सामान, धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होवुन नागरिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच अनेकांची भांडीकुंडी वाहून गेल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत.

त्यामुळे कल्याण शहरातील ज्या-ज्या परिसरात नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झालेले त्या सर्व परीसरात मा.तहसिलदारामार्फत पंचनामा करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची नितांत आवश्यकता असुन या संकट काळात नागरीकांना दिलासा देण्याबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथजी शिंदे, जिल्हाधिकारी ठाणे, मा.तहसीलदार कल्याण यांना पत्र देवून मागणी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com