...तर मग म्याव म्याव केले तर काय चुकलं; नितेश राणेंचा सवाल

हृदयात राम आणि हाताला काम असं आहे तर त्या शिवसैनिक आजींनी...
...तर मग म्याव म्याव केले तर काय चुकलं; नितेश राणेंचा सवाल
Nitesh RaneSaam Tv

भूषण शिंदे

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बहुचर्चित सभा काल मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. याच सभे संदर्भात भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारे आहे असे म्हणाले होते. त्यावर बोलताना राणे म्हणाले की हृदयात राम आणि हाताला काम असं आहे तर त्या शिवसैनिक आजींनी घर आणि नोकरी का मागितली?.

Nitesh Rane
Tripura: माणिक साहा त्रिपुराचे 11 वे मुख्यमंत्री, शपथ घेताच म्हणाले...

'...म्याव-म्याव केले तर काय चुकलं'

मुख्यमंत्र्यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावरुन टीका केली होती. जर देवेंद्रजींनी पाय ठेवला असता तर बाबरी पडली असती तर मग तुम्ही तिथे असते तर कुठेतरी हवेनं उडून गेले असते अस आम्ही म्हणायचं का? दुस-यांच्या वजनाबद्दल बोलले तर चालते. मग तुमच्या मुलाला म्याव म्याव केलं तर काय चुकलं. दुस-याच्या शरीरावर बोलताय तर मग ऐकण्याची ताकद ठेवा असे नितेश राणे म्हणाले आहेत.

''राज ठाकरेंचा केमिकल लोचा तर तुमचा काय''

मुन्नाभाई चित्रपटाचे उदाहरण देऊन उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवरती टीका केली होती. त्यावर राणे म्हणाले ''स्वत:च्याच भावाबद्दल असे कसे काय बोलू शकता. कुटुंबापेक्षा यांना सत्ता मोठी वाटते. राज ठाकरेंचा केमिकल लोचा झाला असेल तर मग एकाच कुटुंबातील म्हणून तुमचाही केमिकल लोचा झाला असणार.'' राज्यात काय चालले आहे ते पाहा काश्मीरमध्ये काय झालं, युक्रेनमध्ये काय झालं, रशियामध्ये काय झालं याच मुद्यावर का बोलता. आम्ही मुंबई या बाप बेट्यांच्या लुटणाऱ्यांपासून वेगळी करणार हेच परत सांगतो. घाणरडे आरोप होत असतील तर आम्ही घाबरणारे नाही, आरेला कारे करत राहू असे नितेश राणे म्हणाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.