"कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल"; मनसे आमदार राजू पाटलांचा संजय राऊतांना टोला

MNS MLa Raju Patil : मनसे आमदार राजू पाटील यांचा खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे
MNS MLa Raju Patil
MNS MLa Raju PatilSaam Tv

डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा नियोजित अयोध्या दौरा (Ayodhya Visit) स्थगित करण्यात आला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राज यांनी हा दौरा स्थगित केला आहे. याचवरून राजकारण पेटले आहे. सर्व पक्षीय नेते प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान आज सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी याबाबत प्रतिक्रिया देतांना मनसेला (MNS) टोला लगावला होता. '5 जूनसाठी राज ठाकरेंना काही सहकार्य हवं असत तर आम्ही केलं असतं', अयोध्या दौरा कश्याला रद्द केला?, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर मनसेचे आमदार राजू पाटील (MNS Mla Raju Patil) यांनी राऊत यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. (MLA Raju Patil criticizes Shiv Sena leader Sanjay Raut In Raj Thackeray Ayodhya Visit Postponed)

MNS MLa Raju Patil
राज ठाकरे यांच्या सभेआधी पुण्यात मनसेला धक्का; कट्टर कार्यकर्त्याचा पक्षाला रामराम

मनसे आमदार राजू पाटील हे म्हणाले की, "पहिली गोष्ट म्हणजे दौरा रद्द झाला नाही आहे, पुढे ढकलण्यात आला आहे आणि आम्हाला यांची गरज नाहीये, कदाचित त्यांना दुःख वाटलं असेल, कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल. त्याचं राजकारणाचं हित साध्य झालं नसेल, पुन्हा एकदा यांना सुपारी द्यावी लागेल, त्याचे दुःख वाटले असेल. राज साहेबच्या तब्येतीच्या कारणास्तव हा दौरा स्थगित केला आहे.साहेब भूमिका परवा स्पष्ट करणार आहेत", असे म्हणत आमदार राजू पाटील यांनी संजय राऊत यांच्या टोल्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

"...म्हणून ते एकटे जाऊ शकतात"

काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी आम्ही अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहोत, दौऱ्यासाठी नाही असं विधान यांनी केलं होतं. यावरही मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसे आमदार यांनी सांगितलं की, त्यांच्या नावातच लोंढे आहे. त्यांना लोंढे घेऊन जायची गरज नाही. म्हणून ते एकटे जाऊ शकतात. त्यांनी कसं जायचं, कसं नाही जायचं त्यांचा विषय आहे. असं सांगत मनसे आमदार राजू पाटील यांनी संजय राऊतांना सुनावलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com