
पुणे : आगामी महापालिका निवडणूक डोळ्यापुढं ठेवून मुंबईसंदर्भात काल राज्यपाल महोदयांनी मांडलेला नवीन ‘सिद्धांत’ ऐकूण आश्चर्य वाटलं नाही. कारण आजवर IFSC सेंटर, बुलेट ट्रेन, शिपयार्ड (ही लांबलचक यादी आहे) अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा वारंवार प्रयत्न झाला आहे. आता तर मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय पण महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नसल्याचं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी काल मुंबईती एका कार्यक्रमामध्ये मुंबईबाबत एक वादग्रस्त केलं आहे. 'गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, त्यांच्या याच वक्तव्यावर राज्यभरातून सडकून टीका केली जात आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी देखील राज्यपालांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. अशातच आता राज्यपालांच्या या वक्तव्याचे आपणाला आश्चर्य वाटत नसल्याच ट्विट आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं आहे.
त्यांनी ट्विटमध्ये (Tweet) म्हटलं आहे की, 'आगामी महापालिका निवडणूक डोळ्यापुढं ठेवून मुंबईसंदर्भात काल राज्यपाल महोदयांनी मांडलेला नवीन ‘सिद्धांत’ ऐकूण आश्चर्य वाटलं नाही. कारण आजवर IFSC सेंटर, बुलेट ट्रेन, शिपयार्ड (ही लांबलचक यादी आहे) अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा वारंवार प्रयत्न झाला आहे. आता तर मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय पण महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही.
मुंबईचं आजचं स्थान हे सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे आहे. पण त्यात भेदभाव करुन मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करा, असं म्हणायलाही कदाचित भेदभाव करणारे कमी करणारा नाहीत.
वास्तविक सर्वांना सामावून घेण्याइतकं समुद्रासारखं विशाल मन मुंबई व महाराष्ट्राचं आहे. याचा गैरफायदा घेत समुद्राच्या काठावर राहणाऱ्या मोठ्या व्यक्तीकडून मराठी माणसाला कमी लेखण्याचा आणि भाषा व प्रांतवाद निर्माण करण्याचा होणारा प्रयत्न दुर्दैवी व महाराष्ट्राच्या भावना दुखावणारा आहे.
जबाबदार पदावरील व्यक्तीने वादग्रस्त वक्तव्ये करण्यापेक्षा विश्वासदर्शक ठरावासाठी तातडीने अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयाप्रमाणे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जनतेला मदत करण्याबाबत सरकारला तातडीने पत्र पाठवण्याची आज खरी गरज आहे असं ट्विट करत रोहित पवार यांनी राज्यपालांवरती निशाणा साधला आहे.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.