Toll Plaza : टाेल वाल्यांचं करायचं काय खालती डोकं वरती पाय...! आमदार विनाेद निकाेलेंचा महामार्गावर ठिय्या

पालघर जिल्ह्यात टाेल माफी झालीच पाहिजे अशी घाेषण देत आंदाेलकांनी परिसर दणाणून साेडला.
palghar, mumbai ahmedabad highway, toll plaza
palghar, mumbai ahmedabad highway, toll plazasaam tv

पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (mumbai ahmedabad highway) चारोटी येथील टोल प्रशासन (Toll Plaza) विरोधात आक्रमक झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या डहाणूच्या आमदार विनोद निकोले (MLA Vinod Nikole) यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह टोल नाक्यावरच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान या आंदाेलनामुळे गुजरातकडून (gujarat) मुंबईकडे (mumbai) येणारी वाहतुक खाेळंबली आहे. (mumbai ahmedabad highway news)

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. मात्र वारंवार मागणी करूनही हे खड्डे बुजवले जात नाहीत. त्यातच टोल वसुली करणाऱ्या कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीकडून स्थानिक वाहन चालकांकडून देखील दमदाटी करून टोल वसूल केला जात असल्याचा आरोप करत आमदार विनोद निकोले यांनी करत थेट महामार्गावरील रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी आंदाेलकांनी घाेषणा देत परिसर दणाणून साेडला.

palghar, mumbai ahmedabad highway, toll plaza
Parbhani Accident : लातूर- नागपूर बस, ट्रॅव्हल्स अपघातात २५ जखमी, दहा गंभीर; चालक मृत्यूमुखी

आमदार विनाद निकाेल यांनी लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. या आंदाेलनात माकपचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले आहे. खड्डे बुजविणे, रुग्णवाहिका सेवा, अग्निशमनची सुविधा आदींची मागणी माकपाकडून करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

palghar, mumbai ahmedabad highway, toll plaza
Single- Use Plastic Ban : सहा दुकानांच्या तपासणीत ५०० किलाे सिंगलयुज प्लास्टिक जप्त; ३५ हजारांचा दंड वसूल
palghar, mumbai ahmedabad highway, toll plaza
Khopoli Accident News : खोपोलीत दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू
palghar, mumbai ahmedabad highway, toll plaza
Satara : गोडोली तळे परिसरात धर्मवीर संभाजीराजेंचा पुतळा बसविला जाणार : वृषालीराजे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com