राज ठाकरेंनी घेतलेल्या पदाधिकारी मेळाव्यात या ३ मुद्द्यांवर झाली चर्चा

आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
Raj Thackeray
Raj Thackeray Saam Tv

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसे (MNS) सध्या मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आक्रमक झाली आहे. राज ठाकरे देखील हिंदुत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. दरम्यान,आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. तसंच, एक पत्र राज ठाकरे देणार आहे. सदर पत्र १२ कोटी नागरिकांना पाठविण्यात येणार,अशी घोषणा मनसेने मेळाव्यात केली आहे. ( Raj Thackeray Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेचा पदाधिकारी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. हा मेळावा संपन्न झाल्यावर मनसे नेते गजानन काळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी गजानन काळे म्हणाले, 'मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घेतलेल्या राज्यव्यापी मेळाव्यात तीन प्रमुख विषयांवर चर्चा केली. यामध्ये राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भातील आशयाचं पत्र पाठवण्याचं ठरलं आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी अशा तीन भाषांमध्ये हे पत्र असेल. सुमारे १२ कोटी जनतेला पाठवण्यात येणारे हे पत्र राज ठाकरे यांच्या भाषणाप्रमाणे धारदार असेल,असे काळे यांनी सांगितले.

Raj Thackeray
संभाजीराजे छत्रपती यांंचा गेम महाविकास आघाडीने केला - प्रविण दरेकर

दरम्यान, मनसेने काही दिवसांपूर्वी भोंगे हटवण्यासाठी डिजीटल स्वाक्षरी मोहीम देखील राबवली होती. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक फॉर्म जारी केला होता. त्यात त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरवले पाहिजेत का,या मागणीला समर्थन आहे का ? या विषयावर मत मागविले होते. तसेच या फॉर्ममध्ये शहर, परिसर,गावाचे नाव, नाव, संपर्क क्रमांक ही सर्व माहिती भरून फॉर्म सबमिट करण्याचं आवाहन मनसेनं केलं होतं.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com