MNS Andolan: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; भाजपच्या मंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

Mumbai-Goa Highway: एका लेनचे काम झाले आहे मात्र त्यावरही खड्डे पडलेत, असेही आंदेलनकर्त्यांनी म्हटले आहे.
MNS Andolan
MNS AndolanSaam TV

MNS News:

मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांचा आज सरकारकडून सत्कार करण्यात आला. अभियंता दिनानिमित्त विशेष कार्यक्राम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात मनसेने जोरदार आंदोलन केलं आहे. (Latest Marathi News)

MNS Andolan
Raju Patil News: 'भाजपने जागर यात्रा काढावी, गाजर यात्रा नाही; मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून मनसे आमदार राजू पाटील यांची खोचक टीका

मुंबई ते षण्मुखानंद सभागृहाबेर मनसेने आंदोलन केलं आहे. मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करावा या मागणीसाठी मनसेने संदिप देशपांडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले . जर 'कामंच झालेलं नाही तर तुम्ही यांचे सत्कार कसले करता? असा सवाल मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. मुंबई गोवा महामार्गावरच्या एकाच लेनचे काम झाले आहे मात्र त्यावरही खड्डे पडलेत, असेही आंदेलनकर्त्यांनी म्हटले आहे.

या कार्यक्रमास रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते. मनसेकडून त्यांच्या विरोधत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले. आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले. पोलिसांनी संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच अन्य सर्व कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. मनसेचे आंदोलन सुरू असताना पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आलीये.

MNS Andolan
Kalyan News: राज ठाकरेंकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र; तर कल्याणमध्ये भाजपच्या माजी उपमहापौराच्या बॅनरवर मनसे आमदाराचा फोटो, चर्चांना उधाण

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com