Raj Thackeray Speech: संदिप देशपांडे यांच्या हल्ल्यावर राज ठाकरे कडाडले! ठाण्याच्या सभेतून दिला थेट इशारा, म्हणाले; 'ज्यांनी हल्ला केला..'

MNS Anniversary: नव्या दमाने, नव्या आयुधांसह, अशी घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंची जाहीर सभा आयोजित केली आहे....
Raj Thackeray
Raj Thackeray Saam Tv

Thane: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यातील जाहीर सभा पार पडली. नव्या दमाने, नव्या आयुधांसह, अशी घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंची जाहीर सभा आयोजित केली आहे.

राज्यातील अर्थसंकल्प, मुंबई महापालिका निवडणूक आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला या प्रकरणांवर राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी संदिप देशपांडे यांच्यावरील झालेल्या हल्याबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray
Manish Sisodia : मनीष सिसोदियांना 8.30 तासांच्या चौकशीनंतर अटक! CBI नंतर आता ED ची कारवाई

काय म्हणाले राज ठाकरे...

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचा उल्लेख केला. याबद्दल बोलताना त्यांनी "ज्यांनी हल्ला केला त्याला आधी समजेल आणि नंतर सर्वांना समजेल, असा सणसणीत इशारा दिला. तसेच पुढे बोलताना त्यांनी माझ्या मुलांचे रक्त असे वाया जाऊ देणार नाही," असे म्हणत त्यांनी पाडव्या मेळाव्यामध्ये बोलणार असल्याचेही सांगितले.

Raj Thackeray
Maharashtra budget : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नेमकं काय? CM एकनाथ शिंदेंनी डीटेल्समध्ये सांगितलं

यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे यांनी काही पत्रकार जाणून बुजून मनसेच्या बदनामीचा प्रचार करत असतात, असेही ते यावेळी म्हणाले. "कोणतीही सत्ता नसताना तुमच्या उर्जेनं आपण पक्ष पुढे नेऊ, मी मनसैनिकांचं आभार मानतो, असे म्हणत पक्षातून आजपर्यंत अनेक लोक गेले पण एकटेच गेले," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. (MNS)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com