मनसेकडून उद्या होणाऱ्या महाआरत्या रद्द; राज ठाकरेंनी ट्विट करून दिली माहिती

उद्या ईद असल्याने आरती न करण्याच राज ठाकरे यांच कार्यकर्त्यांना आवाहन.
Raj Thackeray Latest Marathi News, MNS Latest News, MNS News
Raj Thackeray Latest Marathi News, MNS Latest News, MNS NewsSaam TV

मुंबई: मनसेकडून (MNS) उद्या होणाऱ्या महाआरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. उद्या ईद असल्याने आरती न करण्याचं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. (Raj Thackeray Latest Marathi News)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना ३ मे रोजी महाआरती करण्याचे आदेश दिले होते. येत्या तीन तारखेला अक्षय्यतृतीयेच्या (Akshaya Tritiya) दिवशी मनसैनिक ठिक-ठिकाणी महाआरती करा असे आदेश दिले होते.

भोंग्यावरुन राझ ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर ३ मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मनसेचे कार्यकर्ते राज्यभरातील मंदिरांमध्ये 'महा आरती' करतील. आणि ही महाआरती लाऊडस्पीकरद्वारे केली जाईल, असं मनसेने म्हटले होते. पण आता ही महाआरती रद्द करण्यात आल्याची माहिती राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करुन दिली.

'उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंद्याचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. आणि त्याबाबत आपण पुढं काय करायचं हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे मांडेन'., असं राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com