
Raj Thackeray Tweet:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'एक्स' अकाऊंटवर एक पोस्ट करत प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतनिमित्त विनम्र अभिवादन केलं आहे. राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचं हिंदू धर्माबद्दल काय मत होतं. त्यांच्या लिखाणामधील हिंदू धर्माबद्दलच्या मतांचाही त्यांनी उल्लेख केला आहे. (Latest Marathi News)
राज ठाकरे यांनी 'एक्स' पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'पुरोगामी, आधुनिक आणि समतानिष्ठ हिंदुत्वाचा जागर करणारे आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. प्रबोधनकार ठाकरे समग्र वाड्मयात, त्यांच्या एका लेखाचा उतारा सापडतो, त्यात ते म्हणतात. '…आजचा प्रसंग असा बिकट आहे की हिंदूंना साऱ्या जगाशी तोंड देऊन जगावयाचे आहे. आजची घटका अशी आहे की हिंदूच्या संस्कृतीची मान साऱ्या जगाच्या राजकारणाच्या चापात सापडलेली आहे'.
'चालू घडीचा मामला असा आहे की सर्व भेदभावांचा सफाई सन्यास करून हिंदुजनांना निरलस भ्रातृभावाने आलेल्या व येणाऱ्या परिस्थितीशी तोंड देऊन आपले हिंदुत्व, आपले आत्मराज्य कायम ठेवून, हिंदू साम्राज्याच्या विशाल आकांक्षांनी हिंदी राष्ट्राचे विराट हृदय चबचबीत भिजवून सोडले पाहिजे.” पण असं असताना पण आमच्या आजोबांचं हिंदुत्व कुठल्याही एका विचारधारेला बांधलेलं नव्हतं', असं राज ठाकरे म्हणाले.
'अंधश्रद्धा, रूढी, जातीभेदावर आसूड ओढतानाच, हिंदू समाजाने संपूर्ण जगाला मार्गदर्शन केलं होतं आणि ते करण्याची ह्या धर्मात अपार शक्ती आहे ह्याची जाणीव होती अभिमान होती. हीच शक्ती पुन्हा ह्या धर्मात जागृत व्हावी असं त्यांना मनापासून वाटत होतं. आजोबांच्या तेजस्वी आणि धर्माभिमानी विचारपरंपरेचा भाग असल्याचा मला नेहमीच आनंद आणि अभिमान वाटत आला आहे. प्रबोधनकरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन, असेही ते पुढे म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.