Raj Thackeray News: 'राज्याच्या राजकारणाचा चिखल झालाय...' राज ठाकरेंचा संताप, म्हणाले; '22 तारखेला डायरेक्ट...'

या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणावर संताप व्यक्त केला आहे..
Raj Thackeray, MNS News Update
Raj Thackeray, MNS News UpdateSAAM TV

Mumbai News: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेनेमध्ये पडलेल्या दोन गटांवरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्याच्या या राजकीय परिस्थितीवर आणि सत्तासंघर्षावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच २२ तारखेच्या पाडवा मेळाव्यात याबद्दल सविस्तर बोलेन असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Raj Thackeray, MNS News Update
Raj Thackeray : सध्या मतदारांना काहीच किंमत नाही; राज ठाकरेंना असं का वाटतंय?

याबाबत अधिक माहिती अशी की,मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राजभाषा महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर सविस्तर उत्तरे दिली. या मुलाखतीत राज ठाकरेंना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न विचारला असता त्यांनी राजकारणाचा चिखल झाला आहे, असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले राज ठाकरे....

यावेळी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी "महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे, म्हातारी मेल्याच दुःख नाही काळं सोकावतो आहे," अशा शब्दात हल्लाबोल केला. तसेच "सध्या जे काही चालू आहे. त्यावर 22 तारखेला गुडी पाडव्याला शिवतीर्थवर सविस्तर बोलणार आहे, आता कुठला ट्रेलर टीझर नाही तर डायरेक्ट पिक्चरच दाखवतो," असेही ते यावेळी म्हणाले..

Raj Thackeray, MNS News Update
Dada Saheb Phalke Award: "माझी लायकी..." प्रसिद्ध मॉडेलने 'दादासाहेब फाळके पुरस्कार' परत केला, 'हे' मोठं कारण देऊन पुरस्कार नाकारला...

दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी त्यांचे आवडीचं पुस्तक देखील सांगितलं. "खरंतर बरीच पुस्तकं खूप जवळची आहेत. पण दादा कोंडके यांच्यावरचं 'एकटा जीव' हे पुस्तक खूप छान आहे. ते कुठूनही वाचता येतं. कुठूनही तुम्ही ते वाचायला सुरुवात केली की त्यात रमून जाता", असं राज ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News Update)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com