मराठी वेब सीरीजमध्ये हिंदी शब्द अधिक का? 'अथांग'च्या ट्रेलर लाँचच्या सोहळ्यात राज ठाकरेंनी उपस्थित केला सवाल

राज ठाकरे यांनी मराठी वेब सीरीजमध्ये अधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या हिंदी शब्दांवर प्रश्न उपस्थित केला.
Raj Thackeray news
Raj Thackeray news saam tv

श्रेयस सावंत

Raj Thackeray News : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठीचा नवी वेब सीरीज 'अथांग'च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडितने घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी मराठी चित्रपट, ओटीटी प्लॅटफॉर्म, मराठी वेब सीरीज या विविध विषयावर भाष्य केलं. तसेच राज ठाकरे यांनी मराठी वेब सीरीजमध्ये अधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या हिंदी शब्दांवर प्रश्न उपस्थित केला. (Latest Marathi News)

Raj Thackeray news
खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? महाजनांच्या आरोपावर नाथाभाऊ संतापले; इतकं नीच राजकारण...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत मराठी नवी वेब सीरीज 'अथांग'चा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या वेब सीरीजची निर्माती तेजस्विनी पंडित आहे. या सोबत राज ठाकरे यांच्यासोबत अशोक सराफ या सोहळ्याला उपस्थिती होते.

राज ठाकरे म्हणाले, 'मराठी वेब सीरीज पाहताना मला खूप आनंद होतो. खरं तर मला सिनेमे पाहणे खूप आवडतात. तो माझा छंद आहे. मी खरं तर सिनेप्रेमी आहे. त्यामुळे मी सिनेमा खूप पाहतो. माझ्याकडे एक हार्डडिस्क आहे, ज्यात ९००० सिनेमे आहेत. मी ते सर्व सिनेमे पाहिले आहेत'.

'काही दिवसांपूर्वी मी एक मराठी वेब सीरीज पाहिली. पण मला कळालं नाही की, त्यात एवढे हिंदी शब्द का होते ? हिंदी शब्द असणं चुकीचं नाही आहे. मात्र, मराठी भाषेला प्राधान्य हे मिळाले पाहिजे', असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

'सध्या बायोपिक सिनेमाचा माहोल झाला आहे. अनेक बायोपिक सिनेमे येतात, पण मला सिनेमा म्हणजे गांधी बाकी कोणताही नाही. मला चार्ली चॅप्लिनचा बायोपिक देखील आवडला नव्हता. जर खरंच एका राजकारणातल्या व्यक्तीचा बायोपिक मी पाहायचा असेल तर मला वाटतं की इंदिरा गांधी यांचा असेल. कारण किती गोष्टी आहेत. एक कमाल कथा होऊ शकते', असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, 'मला माहीत नाही, मी सिनेमा दिग्दर्शन करेन किंवा निर्मिती करेन. मला खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा काढायचा होता. मात्र, सध्या एवढे सिनेमे झाले आहेत की, मी आता तरी सिनेमा काढणार नाही'.

Raj Thackeray news
मोदी सरकारच्या पाच वर्षात बँकांकडून 10 लाख कोटी रुपयांचं राईट ऑफ; RTI मध्ये खुलासा

स्वत: विषयीच्या बायोपिकवरील प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, 'माझ्या आयुष्यावर बायोपिक का आणि कशाला? मला अगोदर घरी जाऊन बायकोला विचारावं लागेल. मला माहीत नाही, माझी भूमिका कोण करेल. मात्र, जे होईल तेव्हा पाहू'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com