Raj Thackeray: राज्यात येत्या जानेवारीत निवडणुका लागणार, राज ठाकरेंचे संकेत

राज ठाकरे यांच्या वक्तव्यातून निवडणुका नेमक्या कुठल्या हे स्पष्ट झालेलं नाहीत.
Raj Thackeray
Raj Thackeray Saam Tv

मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं सांगत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही येत्या जानेवारी महिन्यात निवडणुका लागतील, असे संकेत दिले आहेत.

मात्र राज ठाकरे यांच्या वक्तव्यातून निवडणुका नेमक्या कुठल्या हे स्पष्ट झालेलं नाहीत. परळमधील कोकण महोत्सवाला आज राज ठाकरे यांनी भेट दिली होती, तिथे ते बोलत होते. (Latest Marathi News)

Raj Thackeray
उद्धव ठाकरेंवर अशी वेळ येईल की त्यांच्यासोबत स्टेजवर केवळ चार लोक दिसतील, भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून बरेच अॅक्टिव्ह झालेले दिसत आहेत. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी असो किंवा लहान मोठ्या कार्यक्रमांना राज ठाकरे हजेरी लावताना राज ठाकरे दिसत आहेत. राज ठाकरे यांच्या हालचाली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला होता.

राज ठाकरे यांनीच आता येत्या जानेवारीत निवडणुकांचे संकेत दिले आहेत. राज ठाकरे यांनी म्हटलं की, घशाला सध्या आराम देतोय. निवडणुका लागतील, त्यामुळे जानेवारीमध्ये बोंबलायचंच आहे. घसा आपला असतो, तर गळा लता मंगेशकर अशा मोठ्या लोकांचा असतो.

Raj Thackeray
Mumbai : शालेय विद्यार्थ्यांची मधुमेह तपासणी केलीच नाही; 'त्या' वृत्ताबाबत पालिकेचे स्पष्टीकरण

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन राज्यात जानेवारीमध्ये निवडणुका पार पडणार आहेत असे संकेत मिळत आहे. मात्र या निवडणुका मुंबई महापालिकेच्या असतील की विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकी असतील, हे राज ठाकरेंनी स्पष्ट केलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात जानेवारीत नेमक्या कोणत्या निवडणुका लागणार याची चर्चा रंगू लागली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com