राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या भाषणाचा 'तो' व्हिडिओ केला शेअर
MNS Chief Raj Thackeray Tweets old video of late Balasaheb ThackerayTwitter/ @RajThackeray

राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या भाषणाचा 'तो' व्हिडिओ केला शेअर

Raj Thackeray Tweets old video of late Balasaheb Thackeray : धर्म असा असावा लागतो की, तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये, लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये.

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या एक जूना व्हिडिओ (Video) शेयर केला आहे. यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी रस्त्यावर केल्या जाणाऱ्या नमाजबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. सध्या राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) बाळासाहेबांप्रमाणेच मशिदींवरील (Masjid) भोंग्यांबाबत भूमिका घेतली आहे. मात्र राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या हा व्हिडिओ पोस्ट करुन शिवसेनेला डिवचायचा प्रयत्न आहे का असा सवाल उपस्थित होतोय. (MNS Chief Raj Thackeray Tweet old video of late Balasaheb Thackerays about the masjid loudspeaker)

हे देखील पाहा -

शिवसेना संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या या जून्या व्हिडिओत ते म्हणाले होते की, "ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल त्यावेळेला रस्त्यामधले नमाज आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की, तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये, लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदु धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल त्याने मला येऊन सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत."

शिवसेना संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे

दरम्यान राज्यातील अनेक मशिदींमध्ये सकाळची अजान ही भोंग्याविनाच झाली. तर ज्याठिकाणी मशिदींवरील भोंग्यावर अजान झाली त्याठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्पीकरवर हनुमान चालीसा लावली. ४ मे नंतर जर मशिदींवरील भोंग्यावर सरकारकडून कारवाई झाली नाही तर आपण मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचं मनेसकडून सांगण्यात आलं होतं. आज मनसेने दिलेला तो अल्टिमेटमची मुदत संपली असल्याने राज्यभरात मनसेचं आंदोलन सुरु आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.