Raj Thackeray : वेठबिगारी प्रकरणाची चौकशी करा; राज ठाकरेंचं राज्य सरकारला पत्र

गेल्या काही दिवसांपासून राज्यात लहान मुलांकडून वेठबिगारी करून घेण्याच्या घटना समोर येत आहेत. या प्रकारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Raj thackeray
Raj thackeray saam tv

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात लहान मुलांकडून वेठबिगारी करून घेण्याच्या घटना समोर येत आहेत. या प्रकारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखल चौकशी व्हावी, राज्य सरकारने (Eknath Shinde) सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं. अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. (Raj Thackeray News Today)

Raj thackeray
Eknath Shinde : CM शिंदेंनी रात्री उशिरा घेतली अमित शाहांची भेट; नेमकी काय चर्चा झाली?

राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून लहान मुलांकडून अशा प्रकारे वेठबिगारी करून घेणाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशाराही दिलाय. असे प्रकार कुठे घडत असतील तर पोलिसांत तक्रार करा किंवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार टाकण्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे. राज्यात मुलांचं शोषण होऊ नये. लहान मुलांकडून कोणीही वेठबिगारी करून घेऊ नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट

'गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत'.

'पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही'.

Raj thackeray
Corruption: भ्रष्टाचार प्रकरणात चीनच्या माजी मंत्र्यांसह दोघांना मृत्युदंडाची शिक्षा

'राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं. पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं'.

'वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांची तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील. ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा'. असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com