राज ठाकरेंची सुरक्षा वाढवूनही ठाकरे सरकारवर मनसे नाराज

राज्य सरकारने राज ठाकरेंच्या सुरक्षेत २ पोलिसांची वाढ केली आहे.
राज ठाकरेंची सुरक्षा वाढवूनही ठाकरे सरकारवर मनसे नाराज
Raj Thackeray Saam TV

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सुरक्षेत राज्य सरकारने वाढ केली आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांना धमकी मिळाली होती. त्यानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. एक अंमलदार आणि एक पोलीस अशी वाढ केली आहे. आता राज ठाकरेंच्या सुरक्षेत ६ पोलीस असणार आहेत. यावर मनसे (MNS) नेते बाळा नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वाढवलेल्या सुरक्षेबाबत आम्ही समाधानी नाही. राज्य सरकारने सुरक्षेचा दर्जा वाढवलेला नाही. राज ठाकरे यांना झेड किंवा झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी आमची मागणी आहे, असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

Raj Thackeray
Raj Thackeray | राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला ''माफी मांगो राज ठाकरे'' गीतातून विरोध !

मनसे (MNS) नेते यशवंत किल्लेदार यांनीही राज्य सरकारने दिलेल्या दोन पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. 'अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सुरक्षेत २ पोलिसांची वाढ करून राज्य सरकारने तोंडाला पान पुसण्याचे काम केले आहे. राज ठाकरे यांना झेड किंवा झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो, त्यांनी अंस करू नये, असंही किल्लेदार म्हणाले.

भोंगा प्रकरणावरुन आले होते धमकीचे पत्र

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळव्यात मशिदींवरील भोंग्या विरोधात भूमिका घेतली होती. राज्य सरकारला ४ मेपर्यंतचा इशारा दिला होता. ४ मे रोजी मनसेने राज्यभर आंदोलन केले होते.

भोंगा प्रकरणी आंदोलन सुरु केल्यानंतर बाळा नांदगावर यांच्या कार्यालयात उर्दू भाषेत एक धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात राज ठाकरेंचेही (Raj Thackeray) नाव असल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरेंना काही झाले तर महाराष्ट्र पेटवू असा इशाराही नांदगावकर यांनी दिला आहे.

Edited By- Santosh kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.