Pune: राज ठाकरे एक नंबर! पुण्यात सुरू झालेल्या मनसेच्या सदस्य नोंदणीत राज यांचा क्रमांक ००००००१

MNS Hindivi Nondani Campaign Started In Pune : मनसेने तंत्रज्ञानाचा आधार घेत डिजिटल नोंदणी सुरू केली आहे. यानुसार पहिलं सदस्यत्व राज ठाकरेंनी स्वतः घेतलं आहे.
Raj Thackeray MNS ID Card No. 0000001
Raj Thackeray MNS ID Card No. 0000001Saam TV

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा सक्रिय झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज, गुरुवारपासून पुण्यात सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. मनसेकडून 'हिंदवी नोंदणी' असं या सदस्य नोंदणी अभियानाला नाव देण्यात आलं आहे. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मनसेच्या सदस्य नोंदणीच्या अभियानाची माहिती देत मनसेचं सदस्य होण्याचं आवाहन केलं आहे. मनसेने तंत्रज्ञानाचा आधार घेत डिजिटल नोंदणी सुरू केली आहे. यानुसार पहिलं सदस्यत्व राज ठाकरेंनी स्वतः घेतलं असून त्यांचा सदस्य नोंदणी क्रमांक हा ००००००१ असा आहे. (MNS Hindivi Nondani Campaign Started In Pune)

हे देखील पाहा -

राज ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभासद नोंदणी २५ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. जेव्हा जेव्हा सभासद नोंदणी झाली तेव्हा ती मुंबईतून झाली, यावेळी ती पुण्यातून होत आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक पक्षाला सभासद नोंदणी दर ३ ते ४ वर्षांनी करावी लागते. याअगोदर लॉकडाऊनच्या आधी मनसेची सभासद नोंदणी झाली होती, त्यानंतर आता नव्याने सभासद नोंदणी पुन्हा होणार आहे. माझी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सदस्य व्हावं असं आवाहन यावेळी राज ठाकरेंनी केलं आहे.

Raj Thackeray MNS ID Card No. 0000001
Maharashtra: 'एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी'; मंत्री, अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन घेणार आढावा

पुढे राज ठाकरे म्हणाले की, यावेळेला जे सदस्य होणार आहेत, त्यांना दर आठवड्याला त्यांच्या मोबाईलवर अनेक गोष्टी जाणार आहेत. यात माझी भाषणं असतील किंवा माझं काही बोलणं असेल, किंवा इतर काही विषय असतील अशा सर्व गोष्टी सभासदांच्या मोबाईलवर जाणार आहे. माझं पहिलं रजिस्ट्रेशन इथे आज झालेलं आहे. "मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानतो की, मला सदस्य करुन घेतलं" असं गंमतीशीर वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com