Devendra Fadnavis : मनसे आमचा पार्टनर नाही, युतीचा सध्यातरी विचार नाही; फडणवीसांकडून मनसे-भाजप युतीच्या चर्चांना पूर्णविराम

मनसेसोबत युतीचा सध्यातरी कोणताही विचार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Tv

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवाजी पार्कातील दीपोत्सवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले होते. यानंतर राज्यात नवीन युती पाहायला मिळणार, अशा चर्चा रंगली होती. त्यांनी दोन्ही तिन्ही पक्षातील नेत्यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र मनसेसोबत युतीचा सध्यातरी कोणताही विचार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)   यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis
TATA एअरबस प्रकल्प गुजरातला जाणार हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना माहिती होतं; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

मनसे आमचा पार्टनर नाही. पण राज ठाकरेंसोबत आमची वैयक्तिक मैत्री आहे. आता काही प्रमाणात ही मेत्री वैचारिक देखील आहे. कारण मनसेनं हिंदुत्व स्वीकारलं आहे आणि आम्ही हिंदुत्वावादी आहोत. पण आमची कुठेही युती नाही किंवा युतीचं बोलणं नाही. युतीच्या दिशेने जाण्याचा कोणताही विचार सध्यातरी नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis
काँग्रेसमधूनही काही लोक येऊ शकतात; सामच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

होय मी बदला घेतला

तुमच्यासोबत २४ तास राहणारा व्यक्ती, तुमच्यासोबत सत्ता भोगणार व्यक्ती, तुमच्यासोबत निवडून आलेला व्यक्ती हा थेट तुमच्या पाठीत खंजीर खुपसतो त्यावेळी राजकारणात जीवंत राहून त्याला ते परत करावं लागतं. नाहीतर तुम्ही राजकारणात जगता येत नाही. राजकारणात चांगलंच राहिलं पाहिजे. पण तुमच्या चांगुलपणाचा कुणी फायदा घेत असेल तर बेईमानाला जागा दाखवलीच पाहिचे. त्यामुळे होय मी बदला घेतला आणि मला त्याचा अभिमान आहे.

भाजप आणि ठाकरे गट कधीही एकत्र येणार नाही

उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे नुकसान करून घेतले आहे. माझी आणि उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक दुश्मनी नाही. आम्ही राजकीयदृष्ट्या दूर गेलो पण आता मनही जवळ येणार नाही. आता आम्ही यापुढे कधीही एकत्र येणार नाही, तशी परिस्थिती नाही. राजकारणात कुणीही कोणाला संपवू शकत नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपला पूर्णपणे बहुमत मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com