Crime : बोरीवलीत छमछम पुन्हा सुरू? तरुणींवर पैशांची उधळण, मनसे नेत्याने उघडकीस आणला प्रकार

मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा छमछम सुरू झाली असल्याची बाब उघडकीस आली आहे.
mumbai crime news
mumbai crime news saam tv

संजय गडदे

Borivali crime news : मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा छमछम सुरू झाली असल्याची बाब उघडकीस आली आहे. मनसेचे नेते नयन कदम यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. नयन कदम यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विट करून माहिती दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)

mumbai crime news
Chalisgaon News: सरपंच, ग्रामसेवकाला कार्यालयात कोंडले; अवैध धंद्यांविरोधात कारवाई नसल्‍याने ग्रामस्थ संतप्‍त

मुंबईत बारमध्ये मुलींना नाचवणे आणि त्यांच्यावर पैशाची उधळण करणे या गोष्टींना कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र मुंबईच्या कस्तुरबा मार्गातील पार्कसाईट 14 ते 15 बार अवैधपणे पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असल्याचे मनसे नेते नयन कदम यांनी उघडकीस आणले आहे.

या व्हिडिओमध्ये दारू पिऊन झिंगलेले काही तरुण नृत्य करणाऱ्या मुलींवर पैशाची उधळण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या ट्वीट मधून नयन कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला आहे. तुम्ही ठाण्यात तेरा बार तोडले आता आम्हीही बोरिवलीत बार तोडावेत का? असा सवाल नयन कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) केला आहे.

नयन कदम यांनी ट्विट करत हा प्रकार उघडकीस आणला आहे. 'मुंबईत डान्सबार बोरिवली कस्तुरबामार्ग हद्दीत क्लब9, चारवॉक, पार्कसाईड बार सकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत पैशाची उधळण, अश्लील नृत्य सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात १३ बार तोडले, आता बोरीवलीत आम्ही बार तोडावे का?' असा कदम यांनी केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com