मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र; पुण्यात खळबळ

वसंत मोरे यांनी या धमकी प्रकरणाबाबत एक फेसबुक पोस्टही लिहिली आहे.
मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र; पुण्यात खळबळ
MNS Vasant More News, Rupesh More, Vasant More Latest Marathi News Saam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : पुण्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या मुलाला धमकीचं पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे (Rupesh More) यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने हे धमकीचं पत्र ठेवलं. "सावध राहा रुपेश" अशा आशयाची चिठ्ठी रुपेश मोरे यांच्या कारवर ठेवण्यात आली होती. (Vansant More Sons Rupesh More threatened in Pune)

MNS Vasant More News, Rupesh More, Vasant More Latest Marathi News
'आधी उधारी चुकवा, मगच जा'; हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोतांना अडवलं (पाहा Video)

पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे हे कायम चर्चेत असतात. पुणे महानगरपालिकेतही वसंत मोरे यांचा मोठा दबदबा आहे. कोरोना काळात आपल्या कामामुळे वसंत मोरे हे नेहमीच चर्चेत राहिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकनिष्ठ तसेच एक कट्टर मनसैनिक म्हणून त्यांची पुण्यात ओळख आहे. अशातच वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र आल्याने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (Vasant More Latest Marathi News)

दुसरीकडे, वसंत मोरे यांनी या धमकी प्रकरणाबाबत एक फेसबुक पोस्टही लिहिली आहे. नेमकं काय म्हटलं आहे वसंत मोरेंनी वाचा....

दरम्यान, वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांना "सावध राहा रुपेश" अशा स्वरुपाची देण्यात आलेली ही धमकी नेमकी कोणत्या व्यक्तीने दिली हे अद्यापही समोर आलेलं नाहीये. मात्र धमकीचं पत्र येताच, भारतीय विद्यापीठ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ही धमकी नेमकी कुणी दिली? यामागचा उद्देश काय? हे शोधण्याचं आव्हान आता पुणे पोलिसांसमोर असणार आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com