राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे नेते नॉट रीचेबल; महेंद्र भानुशालीला अटक

MNS leaders are not Reachable after Raj Thackeray was charged : मनसेचे चांदीवली विभागाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे नेते नॉट रीचेबल; महेंद्र भानुशालीला अटक
Raj Thackeray Saam TV

रश्मी पुराणिक, रुपाली बडवे

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचे नॉट रीचेबल झाले आहेत. बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, संतोष धुरी हे सगळे प्रमुख नेते नॉट रीचेबल असून त्यांचे मोबाईल फोन स्विच ऑफ (बंद) येत आहेत. सोबतच पोलिसांनी मनसेच्या (MNS) एका पदाधिकाऱ्याला चांदीवलीतून अटक केली आहे. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर पोलिसांकडून ही पहिली कारवाई करण्यात आली आहे. (MNS leaders are not Reachable after Raj Thackeray was charged; Mahendra Bhanushali arrested)

हे देखील पाहा -

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशीदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केल्यानंतर ज्या मनसैनिकाने पहिल्यांदा हनुमान चालीसा लावण्यात आली त्या मनसैनिकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मनसेचे चांदीवली विभागाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांच्या ऑफिसमधून अनेक भोंगे जप्त करण्यात आले आहेत. घाटकोपर-चिरागनर पोलिसांकडून बर्वे नगर स्मशानभूमीतून भानूशाली यांना अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मनसेचे महत्वाचे नेतेही सध्या नॉट रीचेबल असून मनसेचा एकही नेता फोन घेत नाही.

राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

औरंगाबाद येथील मनसेच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याच्या संदर्भात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सभा घेण्यापूर्वी पोलिसांनी घातलेल्या १६ अटींपैकी १२ अटींचे उल्लंघन या सभेत झाल्याचे सूत्रांकडून समजते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी संध्याकाळी औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. या सभेपूर्वी पोलिसांनी १६ अटी घातल्या होत्या. त्यानंतरच राज यांच्या सभेला परवानगी दिली होती.

Raj Thackeray
Raj Thackeray Latest Update: राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

राज यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचे पडसाद मुंबईत उमटू नयेत किंवा राज यांनी दिलेल्या अल्टीमेटममुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून राज ठाकरे यांनाही पोलीस १४९ अंतर्गत नोटीस बजावू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.